आपल्या परखडपणासाठी प्रसिद्ध असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत सुसान राईस यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. मात्र, राईस यांच्या या निर्णयामुळे जॉन कॅरी यांचा परराष्ट्रमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. परराष्ट्रमंत्रिपदासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची पसंती राईस यांना होती, मात्र रिपब्लिक पक्षाकडून होणारा संभाव्य विरोध हे राईस यांच्या माघारीमागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.  दरम्यान ओबामा यांनी राईस यांची विनंती मान्य केली असल्याचे जाहीर केले.