सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सुब्रमण्यम स्वामींचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

‘मला असं का वाटतं सुशांतने…’; पाहा काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी

‘मला असं का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे’, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचं गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी अनेक दिग्गजांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी जोर धरु लागली आहे. त्यात सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट आता चर्चेत आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वासह सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. त्यातच काही राजकीय व्यक्तींनीदेखील या प्ररकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यातच “मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे”, असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी एक कागदपत्रदेखील शेअर केले आहेत.


दरम्यान,सुशांतला न्याय मिळावा म्हणून चाहत्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यातच अलिकडेच पार्थ पवार यांनीदेखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushant singh rajput was murdered alleges subramanian swamy cites a document ssj

ताज्या बातम्या