संसदेत मोदींनी सांगितला Narendra Modi नावाचा फुलफॉर्म, म्हणाले N म्हणजे….

नरेंद्र मोदी नावातील प्रत्येक अक्षराचा फुलफॉर्म सांगितला…

राज्यसभेत बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते सुशील मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा फुलफॉर्म सांगितला. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवरही टीका केली.

जवळपास ३० मिनिटांच्या भाषणात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी नरेंद्र मोदींच्या नावाच्या फुलफॉर्मसह अनेक आकडेवारीही मांडली. भाषणात सुशील मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं. करोना महामारीनंतर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू शकते, मात्र गेलेले जीव परत आणले जाणार नाही, असे मोदी म्हणाले होते. याचा उल्लेख करत सुशील मोदी यांनी महाभारतातील शांतिपर्वातील संस्कृत श्लोकही ऐकवला आणि याचे सरकारने पालन केल्याचं ते म्हणाले. पुढे बोलताना, लोकं जन धन खात्यांची खिल्ली उडवतात, पण जन धन खातं नसतं तर करोना काळात गरीबांपर्यंत पैसा कसा पोहोचला असता असा सवालही त्यांनी विचारला . नंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावातील प्रत्येक अक्षराचा फुलफॉर्म सांगितला. बघुया सुशील मोदींनी काय फुलफॉर्म सांगितला :

N- New india
A- Aatm nirbhar bharat
R- Ready for reforms
E- Electronic agri market
N- New Financial Structure
D- Disinvestment
R- Railway and roads
A- Agriculture Reforms

M- MSP assured, Helping migrant worker
O- One person company
D- Down to earth
I- Inclusive development

दरम्यान, सुशील मोदींनी हा फुलफॉर्म सांगितल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी बाक वाजवून त्यांना साथ दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushil modi mentions full form of narendra modi name in rajya sabha sas

ताज्या बातम्या