Premium

पुण्यातून पळून गेलेल्या ISIS संशयित दहशतवाद्याला दिल्लीत अटक, पोलिसांची मोठी कारवाई

दिल्लीतील ISIS मॉड्युल दिल्लीसह उत्तर भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. दरम्यान, हे मॉड्युल एका गुप्त माहितीतून उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या.

Mohammad shehanawaz
पुणे मॉड्युल प्रकरणातील दहशवाद्याला अटक (फोटो – NIA)

इस्लामिक स्टेट (ISIS) च्या एका संशयित दहशतवाद्याला आणि इतर दोन दहशतवादी संशयितांना सोमवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. ISIS दहशतवादी मोहम्मद शाहनवाज उर्फ ​​शफी उज्जामा हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात मोस्ट वॉन्टेड यादीत होता. त्याला पकडण्यासाठी ३ लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील ISIS मॉड्युल दिल्लीसह उत्तर भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. दरम्यान, हे मॉड्युल एका गुप्त माहितीतून उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या.

शाहनवाज हा व्यवसायाने इंजिनिअर असून तो पुणे आयएसआयएस मॉड्युल प्ररकणात वॉन्टेड होता. तो दिल्लीचा रहिवासी असून पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यानंतर तो दिल्लीत लपून बसला होता. शाहनवाजसह अटक झालेल्या तिन्ही संशयित दहशतवाद्यांची सध्या चौकशी सुरू आहे.

या कारवाईदरम्यान अनेक साहित्यही जप्त करण्यात आले असून यामध्ये रासायनिक द्रव्यांचा समावेश होता. या रासायनिक द्रव्यांचा इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवण्यासाठी केला जातो. अलीकडेच, एनआयएने शाहनवाज आणि इतर तीन दहशतवादी संशयितांची माहिती देणाऱ्या प्रत्येकी तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत एका डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suspected isis terrorist most wanted arrested in delhi 2 more nabbed in raids sgk

First published on: 02-10-2023 at 11:45 IST
Next Story
Gandhi Jayanti 2023 : मोदी, खरगेंसह दिग्गज नेत्यांनी केलं राजघाटावर अभिवादन, गांधी विचारांना दिला उजाळा