संशयित दहशतवाद्याला पश्चिम बंगालमध्ये अटक

दोन वर्षांपूर्वी त्याने बेकायदेशीरीत्या भारतात प्रवेश केला. बनावट ओळखपत्र तयार करून काही स्थानिकांना त्याने दिली.

राष्ट्रीय तपास संस्थेने जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेबीबी)च्या संशयित दहशतवाद्याला बुधवारी पश्चिम बंगालमधील दक्षिण  २४ परगणा जिल्ह्यातून अटक केली आहे.

सुभाषग्राम परिसरात एनआयएने शोधमोहिम राबवली त्यावेळी अब्दुल मन्नन याला अटक करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी त्याने बेकायदेशीरीत्या भारतात प्रवेश केला. बनावट ओळखपत्र तयार करून काही स्थानिकांना त्याने दिली. दक्षिण परगणा जिल्ह्यात वास्तव्य करण्यापूर्वी तो देशभरात फिरून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बनावट आधारकार्ड तसेच मतदान ओळखपत्र याखेरी दहशतवादी गटांशी संबंधित काही कागदपत्रे त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारेच त्याने परिसरात घर घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आठ नोव्हेंबरपर्यंत त्याची एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suspected terrorist arrested in west bengal akp

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या