आपल्याच घरी काम करणाऱ्या एका आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा निंदनीय प्रकार करणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा पात्रा असं त्यांचं नाव असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर भाजपानं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी आज रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पीडितेनं घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

नेमकं काय आहे प्रकरण?

आरोपी सीमा पात्रा या झारखंडच्या रहिवासी असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. मागील आठ वर्षांपासून आरोपी सीमा पात्रा पीडित आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. त्यांनी पीडित महिलेला आपल्या जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय पीडित महिलेच्या शरीरावर अनेक जखमाही आढळल्या आहेत. आरोपी सीमा पात्रा यांनी आपल्याला गरम वस्तूंने चटके दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

दरम्यान, खुद्द आरोपी सीमा पात्रा यांचा मुलगा आयुष्मान यानंच पीडितेची त्यांच्या जाचातून सुटका केली आहे. त्यानं यासंदर्भात आपल्या एका मित्राला कल्पना दिल्यानंतर या मित्रानं पीडितेला वाचवण्यास आयुष्मानची मदत केली. यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांना पात्रा यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पात्रा यांना अटक करण्यात आली आहे.

आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडलं, आरोपांनतर पक्षाकडून निलंबनाची कारवाई

महिलेनं सांगितली आपबिती

या सर्व प्रकाराबाबत महिलेनं एएनआयशी बोलताना घडला प्रकार सांगितला आहे. “तुम्ही जे जे काही ऐकलं आहे, ते सगळं खरं आहे. ते सगळं माझ्यासोबत घडलं आहे. घरात काम करताना माझ्याकडून जेव्हा चूक व्हायची, तेव्हा मॅडम मला मारहाण करायच्या”, असं सुनीता यांनी सांगितलं आहे. सुनीता यांना सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

“बरं झालं त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली”

दरम्यान, या सगळ्या प्रकाराविषयी बोलताना बाबूलाल मरांडी यांनी सीमा पात्रा यांच्यावर टीका केली आहे. “आम्ही इथे पीडितेला भेटायला आलो होतो. ती एक गरीब महिला आहे. सीमा पात्रांच्या घरी घरकाम करायची. ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलं आहे, ते चुकीचं आहे. सीमा पात्रांना अटक झाली आणि त्यांना पक्षातून हाकलून लावलं हे बरंच झालं”, असं मरांडी म्हणाले आहेत.