एअर इंडिगोच्या विमानात प्रवाशाकडून एअर होस्टेजशी छेडछाड, मद्यधुंद अवस्थेत हात पकडला अन्…; आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

एरिक हॅराल्ड जोनास वेस्टबर्ग (६३) असे या व्यक्तीचे नाव असून तो स्वीडिश नागरिक असल्याची माहिती आहे.

IndiGo emergency gate
संग्रहित छायाचित्र

बँकॉकहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिगोच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने एअर होस्टेसशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. एरिक हॅराल्ड जोनास वेस्टबर्ग (६३) असे या व्यक्तीचे नाव असून तो स्वीडिश नागरिक असल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – हैदराबादमधील चारमिनार येथे दोन गटात राडा, मशिदीसमोर स्टंटबाजी केल्याने झाला होता वाद; VIDEO समोर

एनडीटीव्हीने टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बँकॉकहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिगोच्या विमानात एअर होस्टेसकडून प्रवाशांना जेवण दिले जात असताना हा प्रकार घडला. या वेळी एरिक वेस्टबर्गने २४ वर्षीय एअर होस्टेसचा हात पकडत तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. एअर होस्टेसने त्याचा हात झटकत स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र, त्याने पुन्हा तिचा हात पकडत तिला स्वत:च्या दिशेने खेचले. अखेर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत एरिक वेस्टबर्गला समजावण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – Central Government Employees : सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, आता निवृत्तीचे वय ६० वर्षे, जाणून घ्या…

या घटनेची माहिती एअर होस्टेसने पायलटना दिली. त्यानंतर विमान मुंबई विमानतळावर उतरताच सीआयएसएफने एरिक वेस्टबर्गला ताब्यात घेतले. तसेच त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा – डास मारण्यासाठी लावलेली कॉइल ठरली जीवघेणी; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा तडफडून मृत्यू

दरम्यान, याप्रकरणी आरोपी प्रवाशाच्या वकिलांनी टाईम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया दिली असून त्यांनी एअर होस्टेसने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. वयोमानानुसार एरिक वेस्टबर्गचे हातपाय थरथरतात. त्यामुळे POS मशीनवर पेमेंट करताना त्याने मदतीसाठी एअर होस्टेसचा हात पकडला. यामागे चुकीची भावना नव्हती. त्याने जाणूनबुजून तिला स्पर्श केला नाही, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 15:31 IST
Next Story
हैदराबादमधील चारमिनार येथे दोन गटात राडा, मशिदीसमोर स्टंटबाजी केल्याने झाला होता वाद; VIDEO समोर
Exit mobile version