राजस्थानात स्वाइन फ्लूने आणखी दहा बळी घेतले असून मृतांची संख्या ६७ झाली आहे, असे वैद्यकीय व आरोग्य संचालनालयाने सांगितले.
बिकानेर, अजमेर येथे एच१ एन १ विषाणूने प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत. जयपूर, बारमेर, कोटा, उदयपूर, बन्सवारा व चित्तोडगड येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
स्वाइन फ्लूसाठी १२०० जणांची चाचणी करण्यात आली त्यात ३६६ रुग्णांना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात ३३ पैकी २९ जिल्ह्य़ांना स्वाइन फ्लूने घेरले असून त्यात ढोलपूर, हनुमानगड, सिरोही व बारन या ठिकाणी परिस्थिती तुलनेने सुरक्षित आहे, असे वैद्यकीय व आरोग्य संचालनालयाच्या आकडेवारीनुसार दिसते आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक काल रात्री घेतली व त्यांना विशेष कामगिरी दल प्रत्येक विभाग व जिल्हा पातळीवर स्थापन करण्यास सांगितले आहे. राजस्थानात स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होत आहे. विशेष कामगिरी दलाच्या प्रमुखपदी डॉ. अशोक पानगरिया असतील. ते मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार मंडळातील आरोग्य विषयक सदस्य आहेत. विभागीय पातळीवर विभागीय आयुक्त व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी या कामगिरी दलांचे अध्यक्ष असतील.