राजस्थानात स्वाइन फ्लूने आणखी १० बळी घेतले असून मृतांची संख्या ४९ झाली आहे, ही संख्या नवीन वर्षांतील आहे असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. जे दहा नवीन मृत्यू काल नोंदवण्यात आले त्यात अजमेर (५), जोधपूर (२) व नागौर, जयपूर व टोंक प्रत्येकी एक याप्रमाणे रूग्णांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही स्वाइन फ्लू झाला होता, पण उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे. सध्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनाही स्वाइन फ्लू झाल्याचे चाचण्यात दिसून आले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रूग्णांना खासगी व सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही स्वाइन फ्लू झाला असून त्यांची प्रकृती आता सुधारत आहे  असे त्यांच्या व्यक्तिगत सचिवाने सांगितले. गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांना एच१ एन१ विषाणूची लागण झाली होती, पण उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे.
 नवीन वर्षांत राजस्थानमध्ये एच१ एन१ विषाणूने ४९ जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य संचालनालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्य़ात पाठवण्यात आले आहे. मृतांमध्ये २६ महिला व २३ पुरूषांचा समावेश आहे. जयपूरला १४, अजमेर ९, नागौर ६, टोंक, बिकानेर, दौसा, जोधपूर, बारमेर, कोटा, बुंदी, बन्सवारा येथे प्रत्येकी दोन, तर अल्वर व डुंगरपूर, पाली, झुंझनू येथे प्रत्येकी एकाचा बळी गेला.