स्वीस बँकेत खाते असलेल्या व्यक्तींचा तपशील हा स्वयंचलित माहिती देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत ठराविक कालांतराने भारताला उपलब्ध होत जातो. याच देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत स्वीस बँकेत खाते असलेल्या व्यक्तींची माहिती सोमवारी भारताला देण्यात आली आहे. स्वित्झर्लंडने भारताला दिलेली ही चौथी यादी आहे. देशातील करदात्यांनी योग्य माहिती दिलेली आहे का? योग्य पद्धतीने कर भरलेला आहे का? याची छाननी करण्यासाठी या माहितीची मदत होते.

हेही वाचा >>> झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी जोडप्यानं दिला दोन महिलांचा नरबळी; आधी गळा चिरला आणि मग…

भारत सरकारला स्वित्झर्लंड सरकारकडून स्वीस बँकेतील खातेधारकांची माहिती मिळाली आहे. यामध्ये खातेधारकाचे नाव, पत्ता, टॅक्सपेयर ओळख क्रमांक, खातेक्रमांत तसेच खात्यामध्ये असलेली रक्कम याची माहिती देण्यात आली आहे. याआधी भारताला अशी माहिती २०१९ साली देण्यात आली होती. स्वित्झर्लंडने सोमवारी एकूण १०१ देशांना ३४ लाख खात्यांची माहिती पुरवलेली आहे. यापैकी ७४ देशांनी एकमेकांना त्यांच्याकडील खातेधारकांची माहिती दिलेली आहे. तर २७ देशांकडून स्वित्झर्लंडला माहिती देण्यात आली असून स्वित्झर्लंडलने त्या देशांना या करारांतर्गत माहिती दिलेली नाही. स्वीस बँकेतील खात्यांची माहिती भारताला मिळाल्यामुळे काळा पैसा भारतात आणण्याच्या प्रक्रियेला तसेच करचुकवेगीरी थांबवण्याच्या मोहिमेला गती मिळणार का? असा प्रश्न विचारला जातोय.