scorecardresearch

स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १४३ अब्ज डॉलर्सचा तोटा; ११५ वर्षांच्या इतिहासातला सर्वात मोठा धक्का!

स्विस बँकेला गेल्या ११५ वर्षातला सगळ्यात मोठा तोटा झाला आहे

स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १४३ अब्ज डॉलर्सचा तोटा; ११५ वर्षांच्या इतिहासातला सर्वात मोठा धक्का!
Swiss National Bank posts record 143 billion Dollars loss in 2022

स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १३२ स्विस फ्रँक म्हणजेच १४३ अब्ज डॉलर्सचा वार्षिक तोटा झाला आहे. सोमवारी ही बाब सांगण्यात आली. या बँकेच्या ११५ वर्षांच्या इतिहासात हा सर्वात मोठा तोटा आहे. शेअर आणि बॉण्ड पोर्टफोलिओच्या मूल्यात घट झाल्याने हा तोटा झाला आहे. या घटनेमुळे बाजारात तेजीत असलेल्या स्विस फ्रँकचाही नकारात्मक परिणाम झाला.

स्विस नॅशनल बँक या प्रकरणात ६ मार्चला तपशीलवार आकडेवारी जाहीर करणार आहे. स्विस फ्रँक कमकुवत झाला याची विविविध कारणं आहेत. स्विस बँकेने ८०० अब्ज किंमतीचे स्टॉक्स आणि बॉण्ड्स यामध्येच १३१ अब्ज फ्रँकचं नुकसान झालं. जागतिक शेअर बाजारात मंदी आली. त्यामुळे रोखीच्या किंमती गेल्या वर्षी घसरल्या. यामुळे स्विस नॅशनल बँकेसह सगळ्यात बँकांनी महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवले. मात्र हे देखील तोट्याच्या दिशेने घेऊन जाणारं कारण ठरलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या सगळ्या घटनेत एकच सकारात्मक बाब ही ठरली की स्विस नॅशनल बँकेचं सोनं २०२१ च्या शेवटी १०४० टन इतकं होतं आणि २०२२ मध्ये बँकेचे ४०० दशलक्ष फ्रँक वाढले. २०२२ मध्ये जो तोटा बँकेला झाला आहे त्यामुळे आता ही बँक केंद्र आणि राज्य सरकारांना नेहमीचं पे आऊट करणार नाही. गेल्यावर्षी स्विस नॅशनल बँकेने ६ अब्ज फ्रँक दिले होते.

इतकं प्रचंड नुकसान झालं असलं तरीही त्याचा बँकेच्या धोरणांवर काहीही परिणाम होणार नाही. २०२२ मध्ये चेअरमन थॉम जॉर्डन यांनी स्विस चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदरांमध्ये तीनदा वाढ केली होती असं विश्लेषकांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 18:30 IST

संबंधित बातम्या