T20 WC: “हट्ट करु नका सांगितलं होतं…”, पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने लगावला टोला

T20 WC Pak vs Aus: टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात पाकिस्तान संघ अयशस्वी ठरला

Imran Khan, Rehan Khan,
T20 WC Pak vs Aus: टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात पाकिस्तान संघ अयशस्वी ठरला

T20 WC Pak vs Aus: टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात पाकिस्तान संघ अयशस्वी ठरला. गुरुवारी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा पराभव केला. अटीतटीचा सामना होईल असं वाटत असतानाचा मॅथ्यू वेडने सलग तीन षटकार ठोकले आणि एक ओव्हर राखून सामना जिंकून दिला. संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानते पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करत संघाची पाठराखण केली आहे. यावेळी खेळाडूंच्या काय भावना असतील याची आपल्याला जाणीव असून आपल्या खेळीवर त्यांना अभिमान वाटला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

T20 WC: “क्रिकेटच्या मैदानात मला अशाच….”; पंतप्रधान इम्रान खान यांनी केली पाकिस्तान संघाची पाठराखण

“बाबर आझम आणि संघासाठी: तुम्हाला काय वाटत असेल याची मला कल्पना आहे कारण क्रिकेटच्या मैदानावर मला अशा निराशेचा सामना करावा लागला आहे. पण तुम्ही ज्याप्रकारे दर्जात्मक क्रिकेट खेळला आहात आणि विजयातदेखील नम्रता दाखवलीत त्याचा तुम्हा सर्वांना अभिमान असेल. ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन”, असं ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे.

इम्रान खान यांच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीचं ट्वीट

इम्रान खान यांनी उपांत्य फेरी सामन्याआधी जर पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचला तर आपण सामना पाहण्यासाठी युएईला जाऊ शकतो असं म्हटलं होतं. पण पाकिस्तान संघाचा पराभव झाल्याने अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान यांची पत्नी रहीं रेहम खान यांनीदेखील ट्वीट केलं आणि टोला लगावला. “खानसाहेब अंतिम सामना पाहण्याचा हट्ट करु नका,” असं सांगितलं होतं असा टोला त्यांनी यावेळी ट्वीटमधून लगावला.

रेहम खान ब्रिटीश-पाकिस्तानी पत्रकार आहे. इम्रान खान आणि रेहम खान २०१४-१५ दरम्यान पती-पत्नी होती. लग्नानंतर लगेचच त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.

टी-२० वर्ल्डकपमध्ये एकही सामना न हारता उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाकिस्तान संघाची विजयी घोडदौड अखेर ऑस्ट्रेलियाने रोखली आहे. मॅथ्यू वेड (१७ चेंडूंत नाबाद ४१) आणि मार्कस स्टॉइनिस (३१ चेंडूंत नाबाद ४०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव करत दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc pak vs aus pakistan pm imran khan ex wife rehan khan tweet sgy

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या