भाजपा नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बग्गा यांच्या अटकेला उच्च न्यायालयाने १० मेपर्यंत स्थगिती दिली आहे. यापूर्वी मोहाली न्यायालयाने बग्गा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. मोहाली न्यायालयाने पंजाब पोलिसांना तजिंदरपाल सिंग बग्गा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते.


अर्ध्या रात्री न्यायमूर्तींच्या घरात सुनावणी
बग्गा यांचे वकील अनिल मेहता यांनी अटक वॉरंटला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. बग्गा यांच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर १० मे रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अनूप चितकारा यांच्या घरी रात्री उशिरा बग्गा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
kalyan woman gudi making business marathi news,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!


दोन दिवसांपूर्वीच केली होती अटक
या आदेशाच्या दोन दिवस आधी पंजाब पोलिसांनी बग्गाला त्यांच्या दिल्लीतील घरातून अटक केली होती आणि त्यानंतर त्याला मोहालीला नेण्यात येत होते. मात्र, हरियाणा पोलिसांनी कुरुक्षेत्राजवळ त्यांचा ताफा अडवला. कारण विचारले असता, दिल्ली पोलिसांनीच असे करण्यास सांगितले असल्याचे हरियाणा पोलिसांनी सांगितले. यानंतर हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली आणि बराच वेळ याबाबत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.