मंत्री, आमदाराविरुद्ध कारवाई करा- पोलीस

केंद्रीय मंत्री महेश शर्मा आणि मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी भाजपचे आमदार संगीत सोम यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी शिफारस दादरी स्थानिक पोलिसांनी लखनऊमधील पोलीस मुख्यालयाकडे केली आहे. संगीत सोम यांनी केलेल्या भाषणाची व्हिडीओ फीत आपल्याकडे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामधील काही वक्तव्य प्रक्षोभक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मुझफ्फरनगर दंगलीचा संदर्भ देऊन सोम यांनी हिंदू पूर्वीप्रमाणे […]

केंद्रीय मंत्री महेश शर्मा आणि मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी भाजपचे आमदार संगीत सोम यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी शिफारस दादरी स्थानिक पोलिसांनी लखनऊमधील पोलीस मुख्यालयाकडे केली आहे. संगीत सोम यांनी केलेल्या भाषणाची व्हिडीओ फीत आपल्याकडे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामधील काही वक्तव्य प्रक्षोभक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मुझफ्फरनगर दंगलीचा संदर्भ देऊन सोम यांनी हिंदू पूर्वीप्रमाणे सडेतोड जबाब देण्यास समर्थ असल्याचे म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Take action against minister and police

ताज्या बातम्या