मूळच्या बिहारमधील असलेल्या सत्तर भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये स्थानिक पबमध्ये मद्यसेवन करून मजा लुटल्याच्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. दीड महिन्यांच्या काळात त्यांच्यावर लक्ष ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. बिहारमध्ये  दारू विक्री व सेवनावर बंदी लागू केल्यानंतर हे लोक मद्यसेवनासाठी नेपाळमध्ये आले आहेत.

रोताहाट जिल्हा पोलिसांनी सांगितले. दक्षिण नेपाळ जिल्ह्य़ात अनेक घरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे, असे रोटाहट पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतालगतच्या नेपाळी खेडय़ांमध्ये दीड महिन्यांत ही कारवाई करण्यात आली.

बिहारमध्ये मद्यबंदी लागू करताच तेथील लोक नेपाळी खेडय़ात जाऊन मद्यसेवन करू लागले. शनिवारी पोलिसांनी नऊ भारतीय नागरिकांना ताब्यात घेतले असून रोटाहट जिल्ह्य़ातील गौर या गावात हे लोक मद्यसेवनासाठी बिहारमधील सीतमढी येथून आले होते. या भारतीयांकडून पुन्हा मद्यसेवनासाठी नेपाळमध्ये येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र घेऊन सोडून देण्यात आले.

पाच एप्रिलला बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर बिहारचे काही लोक मद्यसेवनासाठी नेपाळमध्ये जाऊ लागले. बिहारमध्ये बार व रेस्टाँरंटमध्येही मद्यसेवनास बंदी आहे.