महिलांचे चित्रण असलेल्या कार्यक्रमांस तालिबानची बंदी

देशातील माध्यमांसाठी सरकारने या प्रकारचे आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महिलांवरील निर्बंधांविरोधात काबूलमध्ये निदर्शने केली.

काबूल : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने तेथील अभिनेत्रींसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यातून अनैतिकतेचे दर्शन होईल, असा कोणताही कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिन्यांनी प्रसारित करू नये, असे सांगण्यात आले असून, हे निर्देश आदेशात्मक नाहीत, तर धार्मिक मार्गदर्शक तत्त्व आहे, असे सरकारने म्हटले आहे.

मूलतत्त्ववादी तालिबान सरकारने रविवारी अशी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, ज्यात महिलांनी अभिनय केला आहे अशी कोणतीही मालिका किंवा नाटय़प्रयोग आदींचे प्रसारण दूरचित्रवाणी वाहिन्यांनी करू नये, असे सांगण्यात आले आहे. देशातील माध्यमांसाठी सरकारने या प्रकारचे आदेश काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. मूल्यांचा प्रसार आणि वाईट प्रथांना प्रतिबंध यासाठी सरकारने स्थापन केलेल्या विभागाने ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या वेळी सरकार स्थापन करताना तालिबानने आपली राजवट ही आधुनिक मूल्यांचा स्वीकार करणारी असेल असे जाहीर केले होते, पण त्याच्या विपरीत असे निर्देश आता सरकारने जारी केले आहेत.

हे कोणतेही नियम नाहीत, तर धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत, असा दावा सरकारच्या या विभागाचे प्रवक्ते हकिफ मोहाजीर यांनी ‘एएफपी’शी बोलताना केला. याआधीच्या तालिबान राजवटीत तर टीव्ही आणि चित्रपट तसेच तत्सम माध्यमांवर बंदी होती. व्हाइस ऑफ शारिया रेडिओ वाहिनी तेवढी त्या वेळी सुरू होती.

सरकारी फतवा

* इस्लाम तसेच अफगाणी मूल्यांच्या विरुद्ध असलेल्या कार्यक्रमांवर बंदी. यात प्रेषित महंमद यांच्यासह अन्य धार्मिक नेत्यांच्या प्रतिमाचित्रणास बंदी.

* दूरचित्रवाणीवर दिसणाऱ्या महिला पत्रकारांनी हिजाब घालावा.

* पुरुष देहाचे नग्न चित्रण अयोग्य ठरविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taliban banned tv programs featuring women in afghanistan zws

Next Story
आग्नेय आशियात वर्चस्वाचा चीनचा हेतू नाही- जिनपिंग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी