शुभजित रॉय, एक्स्प्रेस वृत्त

नवी दिल्ली : भारत व तालिबानशासित अफगाणिस्तानमध्ये पहिली उच्चस्तरीय बैठक बुधवारी दुबईत झाली. यात अफगाणिस्तानने तेथील उद्याोजक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना भारताने व्हिसा द्यावा अशी मागणी केली आहे.

journey of India’s engagement with the Taliban
तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
RTE admission process begins today 6053 seats available in 327 schools Mumbai print news
आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू ; ३२७ शाळांमध्ये ६ हजार ५३ जागा उपलब्ध
Chandrapur Khalistan supporter arrested
मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…
Loksatta editorial India taliban talks India boosts diplomatic contacts with Taliban Government
अग्रलेख: धर्म? नव्हे अर्थ!
What Omar Abdullah Said?
India Alliance “..तर इंडिया आघाडी बंद करा”; ओमर अब्दुल्लांंचं वक्तव्य, आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत?
India move to engage with Taliban government
तालिबानशी भारताची चर्चा; काय आहे उद्दिष्ट?

हंगामी परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी यांनी दुबई येथील बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याकडे या मागण्या केल्याचे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते हाफिज झिया अहमद यांनी स्पष्ट केले. याबाबत समाजमाध्यमावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थात भारताच्या दृष्टीने व्हिसा मंजूर करणे तीन कारणांसाठी कठीण आहे. यात भारताची अधिकृतपणे तालिबान सरकारला मान्यता नाही. या खेरीज भारतीय गुप्तर संस्थांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच काबुलमधील भारतीय दूतासावात व्हिसा कक्ष कार्यरत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु करणे आव्हानात्मक आहे.

हेही वाचा >>>अफगाणी नागरिकांना व्हिसा सुरू करा! तालिबानची भारताकडे मागणी

भारतात जे येतील त्यांच्याबाबत सुरक्षेचा कोणताही मुद्दा येणार नाही अशी हमी तालिबानच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आली. भारत सरकार ऑगस्ट २०२१ पासून तेथील नागरिकांना व्हीसा देताना कठोरपणे पडताळणी करते. वैद्याकीय उपचारांसाठी काही अफगाण नागरिकांना येथे येण्यासाठी परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे. पाकिस्तानशी संघर्ष सुरु असल्याने वैद्याकीय उपचारांबाबत भारताकडे अफगाण सरकार मोठ्या अपेक्षेने पहात असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याचबरोबर तेथील काही उद्याोगपती विशेषत: ड्रायफ्रुटचा व्यापार करणारे येतात मात्र ही संख्या अत्यल्प आहे.

व्यवहारिक दृष्टीकोनाची अपेक्षा’

अमिर खान मुत्ताकी हे भारताबरोबरच्या बैठकीसाठी वाणिज्य तसेच परिवहन मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह आले होते असे सुत्रांनी सांगितले. तालिबान राजवटीला मान्यता देण्यात भारताला अडचण असल्याचे तेथील सरकारला कल्पना आहे. मात्र व्यवहारिक दृष्टीकोन बाळगल्यास मार्ग काढता येईल अशी तालिबानची अपेक्षा असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

Story img Loader