अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. सरकारच्या पहिल्या वर्धापनदिनी शेकडो तालिबानी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हा दिवस साजरा केला. यावेळी पांढरे आणि काळे झेंडे ठिकठिकाणी फडकवण्यात आले. खुल्या ट्रॅकमधून बंदुका हातात घेत तालिबान्यांनी देशभरात वर्षपूर्तीचा जल्लोष केला. या जल्लोषात मोजक्या अफगाणी नागरिकांनी सहभाग घेतला होता. या उत्सवात महिला कुठेही दिसल्या नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रश्दींवरील हल्ल्यामागे हात असल्याचा आरोप इराणला अमान्य 

भारताच्या दुतावासाजवळ असलेल्या एका सभागृहात तालिबानी राजवटीतील नेत्यांनी भाषणं दिली. दरम्यान, महिलांच्या एका गटाने तालिबानी राजवटीचा एका गुप्तभेटीत विरोध दर्शवला. तालिबान सरकारविरोधात प्रतिकार सुरू ठेवण्याचा निर्धारही या महिलांनी केला. ‘रिव्होलिश्नरी असोसिएशन ऑफ द वूमन ऑफ अफगाणिस्तान’(RAWA) या संघटनेने तालिबान सरकार महिला विरोधी असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेने नियोजितरित्या तालिबानला सत्ता हस्तांतरीत केली, असा आरोपही या संघटनेकडून करण्यात आला आहे.

सू ची यांना आणखी ६ वर्षे तुरुंगवास ; भ्रष्टाचाराच्या चार प्रकरणांत दोषी

वर्धापनदिनी काबुलच्या अहमद शाह मसूद रस्त्यावर मोठ्या संख्येने तालिबानी जमले होते. “आम्ही अमेरिकेला हरवून हे स्वातंत्र्य मिळवलं आहे. त्यामुळे आम्ही हा दिवस साजरा करत आहोत”, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्रालयात कार्यरत एका तालिबानी नेत्याने दिली. अहमद शाह मसूद रस्ता हा अमेरिकेच्या दुतावासापासून अगदी जवळ आहे. आता अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य आहे, हे दाखवून देण्यासाठीच वर्धापनदिन साजरा करण्यासाठी या जागेची निवड करण्यात आल्याचे एका तालिबानी नेत्याने सांगितले. अहमद शाह मसूद यांच्या कुटुंबीयांनी अफगाणिस्तानात येऊन शांततेने राहावं, असं आवाहन यावेळी तालिबानी नेत्यांकडून करण्यात आले.

काही तालिबानी नेत्यांनी वझीर मोहम्मद अकबर खान या डोंगरावर औपचारिकरित्या तालिबानी ध्वज फडकवला. यावेळी जिहादची स्तुती करणाऱ्या गाण्यावर तालिबान्यांनी ‘अतन’ हे पारंपरिक पाश्तून नृत्य केले. अफगाणिस्तानच्या रेडिओ केंद्रावर सोमवारी लहान मुलांनी मुल्लाह उमर यांच्यावर गायलेले गाणे प्रसारित करण्यात आले. तालिबानी सरकार सत्तेत आल्यानंतर देशात शांती नांदत आहे, असे या गाण्याचे बोल होते. तालिबानचा संस्थापक असलेल्या मुल्लाह उमरचा २०१३ मध्ये मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban government completed 1 year in kabul afghanistan rvs
First published on: 16-08-2022 at 11:24 IST