संगीतबंदीमुळे कलावंत परागंदा

काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर तीन आठवड्यांनी तालिबानचे अफगाणिस्तानचे अधिग्रहण पूर्ण झाले.

तालिबानने अफगाणिस्तानातील सत्तेवर पकड घट्ट केल्यानंतर, पाकिस्तानातील लोकप्रिय अफगाणी संगीताचे आश्रयदाते त्यांची कार्यालये बंद करत असून, काबूलमधील कलाकारांना लपून राहणे भाग पडत आहे. यामुळे संगीताचे कार्यक्रम रद्द होत असून, या उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे.

अमेरिकी फौजांनी माघार घेतल्याच्या पाश्र्वाभूमीवर, तालिबानने गेल्या महिन्यात देशभर आक्रमण करून जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या शहरांवर नियंत्रण मिळवले. १५ ऑगस्टला काबूल त्यांच्या ताब्यात आले. विरोधी फौजांच्या ताब्यात असलेल्या पंजशीर या अखेरच्या प्रांतात ६ सप्टेंबरला विजय मिळवल्याचा दावा तालिबानने केला. अशारीतीने काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर तीन आठवड्यांनी तालिबानचे अफगाणिस्तानचे अधिग्रहण पूर्ण झाले.

तेव्हापासून संगीत कलाकारांनी त्यांची वाद्ये घरी नेली आहेत, किंवा गोदामांमध्ये दडवून ठेवली आहेत. २० वर्षांपूर्वी तालिबानने ज्याप्रकारे संगीतावर बंदी घातली होती, तसे ते आताही करतात काय, याची ते वाट पाहात आहेत. जिवाच्या भीतीने काही कलाकार व गायक यांनी पाकिस्तानात जाण्यास सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानातील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे पेशावरमधील  संगीतप्रेमी  आणि गायक व संगीतकार यांच्यासह इतरांनी त्यांची कार्यालये बंद केली आहेत. यामुळे संगीताचा व्यवसाय ठप्प झाला असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

‘संगीत सोडले नाही, तर ते आम्हाला सोडणार नाहीत’

‘‘आम्ही आमचा व्यवसाय सोडला नाही, तर तालिबान आम्हाला सोडणार नाही. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर संगीताचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत’’, असे पसुन मुनावर या अफगाणी गायकाने सांगितले. काबूल तालिबानच्या हातात पडल्यानंतर आपण आपला वेश  बदलून पेशावरमध्ये आल्याचे अजमल या दुसऱ्या गायकाने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Taliban in afghanistan patrons of popular afghan music in pakistan offices closed akp

ताज्या बातम्या