तालिबानच्या मंत्र्यांकडून आत्मघाती हल्लेखोरांचा ‘शहीद’ म्हणून उल्लेख; नातेवाईकांना पैसे, जमीन देण्याची घोषणा

तालिबानचे मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी काबुलमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली

Taliban suicide bombers promise land cash reward
(प्रातिनिधिक फोटो: PTI)

तालिबानच्या एका मंत्र्याने हल्ल्यादरम्यान मरण पावलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांची स्तुती केली आहे. एका अहवालानुसार, तालिबानचे सर्वोच्च मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये या आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या बैठकीदरम्यान सिराजुद्दीनने हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांचे हिरो म्हणून वर्णन केले. तसेच तालिबानने अमेरिका आणि अफगाण सैनिकांवर हल्ला करणाऱ्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या नातेवाईकांना जमिनीचा भूखंड देण्याचे आश्वासन दिले आहे.

सिराजुद्दीन हक्कानी तालिबान सरकारमध्ये गृहमंत्री आहेत. अफगाणिस्तानच्या आरटीएने एका अहवालात म्हटले आहे की हक्कानीने मारले गेलेल्या हल्लेखोरांना जिहादींना शहीद आणि मुजाहिदीन म्हटले. तर तालिबानच्या गृहमंत्र्यांनी त्यांना इस्लाम आणि देशाचे असल्याचे नायक म्हटले. सिराजुद्दीन हक्कानी यांच्यावर अमेरिकेच्या यादीतील दहशतवादी आहे आणि त्याच्या डोक्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस आहे. सिराजुद्दीन हक्कानी यांनी सर्व मृत आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबियांना १२५ डॉलर आणि जमिनीचा भाग देण्याची घोषणा केली.

तालिबानचे कार्यवाहक गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी काबूलच्या एका हॉटेलमध्ये जमलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबातील सदस्यांना बक्षीस दिले, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सईद खोस्ती यांनी मंगळवारी ट्विट केले. सोमवारी संध्याकाळी लोकांना संबोधित करताना हक्कानी यांनी आत्मघाती हल्ल्यात मारल्या गेलेल्यांचा उल्लेख करत शहीद आणि फिदाईनच्या बलिदानाची स्तुती केली असे खोस्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

२०१८ मध्ये तालिबानी बंदूकधारी इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये घुसले होते. त्यांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर आणि कर्मचाऱ्यांवर जोरदार गोळीबार केला आणि अनेक लोकांना ओलीस ठेवले. सिराजुद्दीनचे वडील जल्लालुद्दीन हक्कानी हक्कानी नेटवर्कचे संस्थापक होते. गेल्या दोन दशकात अफगाणिस्तानात झालेल्या अनेक रक्तरंजित दहशतवादी हल्ल्यांचे श्रेय या दहशतवादी संघटनेला आहे. रशियामध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की त्यांचा देश तालिबानला अधिकृत मान्यता देणार नाही. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, सध्या इस्लामिक गटाने अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केल्यानंतर दिलेली आश्वासने पूर्ण करावीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taliban suicide bombers promise land cash reward abn

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका