पीटीआय, ब्राझिलिया
‘‘पाकिस्तानबरोबरील चर्चेसाठी भाषेचा नव्हे, तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी समान उद्दिष्टाचा अभाव ही समस्या आहे,’’ असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी स्प्टकेले. पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर, दहशतवादी जाळ्यावर लक्षवेधक कारवाई केली, तर भारत पाकिस्तानशी चर्चा करू शकतो, असे ते म्हणाले. थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने ब्राझीलमध्ये भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका मांडली.
थरूर म्हणाले, ‘‘दहशतवादाच्या बाबतीत पाकिस्तान निरपराधपणाचा दावा करीत असेल, तर त्यांनी जगामधील ‘वाँटेड’ दहशतवाद्यांना आश्रय का दिला आहे, दहशतवादी पाकिस्तानात शांतपणे का राहू शकत आहेत, प्रशिक्षण शिबिरे घेणे का सुरू आहे? आम्ही पाकिस्तानशी हिंदी, पंजाबी, इंग्रजीतून संवाद साधू. यात कुठलीही अडचण येणार नाही. दहशतवाद्यांविरोधात स्पष्टपणे कारवाई करा. आपण नक्कीच त्यानंतर चर्चा करू.’’