Tamil Nadu Government Formation Updates: पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू आणि केरळच्या निवडणुकांचा निकाल ४ मे रोजी लागल्यापासून या राज्यांचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा आहे. त्यातही तमिळनाडूच्या सत्तास्थापनेची चर्चा रंगत आहे. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही जोसेफ विजय यांच्या टीव्हीकेला ११ आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. आज (९ मे) जोसेफ विजय यांचा शपथविधी होणार का? या घडोमोडींवर लक्ष असेल.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली आहे. आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून दोन्ही राज्यातील राजकीय घडामोडी जाणून घेऊ.

सुवेंदू अधिकारी यांनी बंगालचे नववे आणि भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Live Updates

Tamil Nadu Government Formation Live Updates, West Bengal CM oath ceremony Live Updates

20:29 (IST) 9 May 2026

तमिळनाडूत 'थलापती' पर्व! राज्यपालांची मंजुरी, विजय जोसेफ उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

Vijay Tamil Nadu CM Swearing-in Updates: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ऐतिहासिक बदल घडला असून 'थलापती' विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ...सविस्तर बातमी
19:29 (IST) 9 May 2026

Live: विजय यांनी १२० आमदारांच्या पाठिंब्याने राज्यपाल आर्लेकर यांची घेतली भेट, सरकार स्थापन दावा

टीव्हीके प्रमुख विजय हे राज्यपाल आर्लेकर यांना भेटण्यासाठी आणि सरकार स्थापन करण्याचा आपला दावा सांगण्यासाठी चौथ्यांदा राजभवनात गेले होते.

18:16 (IST) 9 May 2026

हुश्श! अखेर तिढा सुटला, 'व्हीसीके'चा विजय यांच्या 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंबा; तमिळनाडूत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

Thalapathy Vijay TVK Government Formation: व्हीसीकेच्या पाठिंब्यामुळे जोसेफ विजय यांच्या सरकार स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...सविस्तर वाचा
18:15 (IST) 9 May 2026

‘व्हीसीके’चा विजय यांच्या ‘टीव्हीके’ला बिनशर्त पाठिंबा; तमिळनाडूत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याच्या मार्गातील विजय यांच्यासमोरील शेवटचा अडथळा दूर झाला आहे. थोल थिरुमावलवन यांच्या नेतृत्वाखालील ‘व्हीसीके’ने शनिवारी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. टीव्हीकेने आता काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), आययुएमएल आणि व्हीसीके यांच्या पाठिंब्यामुळे ११८ चा बहुमताचा आकडा ओलांडला असून, युतीचे संख्याबळ आता १२० वर पोहोचले आहे.

https://twitter.com/PTI_News/status/2053089441443659826?s=20

16:52 (IST) 9 May 2026

Tamil Nadu Government Formation Live Updates: जोसेफ विजयचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा, VCK चा TVK ला पाठिंबा

जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला व्हिसीकेने अखेर बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे बहुमताचा ११८ हा आकडा गाठण्यात जोसेफ विजय यांना यश आले असून आता लवकरच शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

14:52 (IST) 9 May 2026

West Bengal CM oath ceremony Live Updates: भाजपाचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होताच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. बांगलादेश अवामी लीगच्या वतीने काढलेल्या पत्रकात त्यांनी सुवेंदू अधिकारी यांचे अभिनंदन केले.

https://twitter.com/ANI/status/2053025612135334073

13:30 (IST) 9 May 2026

Suvendu Adhikari oath ceremony: 'भगवा कुर्ता, योगी आदित्यनाथांकडून भगवे उपरणे', आणखी एका हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांचा उदय?

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज शपथविधीच्या सोहळ्यानिमित्त भगवा कुर्ता परिधान केला होता. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भगवे उपकरणे भेट देऊन सन्मान केला. भाजपाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच सुवेंदू अधिकारीदेखील कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणार का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.

12:41 (IST) 9 May 2026

पश्चिम बंगालमध्ये 'अधिकारी'राज; सुवेंदू यांच्यासह 'या' पाच आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Suvendu Adhikari Oath Ceremony West Bengal CM: सुवेंदू अधिकारी यांनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कोलकात्यात दिमाखदार सोहळा ...वाचा सविस्तर
12:22 (IST) 9 May 2026

West Bengal CM Suvendu Adhikari oath ceremony LIVE updates: योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांना भगवे उपरणे देताच उपस्थितांचा जल्लोष

सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींसह सर्वच उपस्थितांना वंदन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुवेंदू अधिकारी यांना भगवे उपरणे देऊन त्यांचा सत्कार केला. यानंतर उपस्थित जमावाने एकच जल्लोष केला.

https://twitter.com/ANI/status/2052993684715802949

12:10 (IST) 9 May 2026

West Bengal CM Suvendu Adhikari oath ceremony LIVE updates: तरूण, आक्रमक नेते निसिथ प्रामाणिक यांचाही शपथविधी

पश्चिम बंगालचे तरूण आणि आक्रमक भाजपा नेते अशी ओळख असलेले माजी केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

https://twitter.com/i/status/2052998215080067528

12:08 (IST) 9 May 2026

West Bengal CM Suvendu Adhikari oath ceremony LIVE updates: खुदीराम टुडू यांचाही शपथविधी

पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते खुदीराम टुडू यांना राज्यपाल आर.एन. रवी यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली.

https://twitter.com/i/status/2052997679828099226

12:07 (IST) 9 May 2026

West Bengal CM Suvendu Adhikari oath ceremony LIVE updates: भाजपा नेते अशोक किर्तनिया यांनीही घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

भाजपा नेते अशोक किर्तनिया यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

https://twitter.com/i/status/2052996602709897598

11:52 (IST) 9 May 2026

West Bengal CM Suvendu Adhikari oath ceremony LIVE updates: भाजपाच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

माजी फॅशन डिझायनर आणि ४० हजारांच्या मताधिक्याने टीएमसी उमेदवाराचा पराभव करणाऱ्या भाजपाच्या महिला आमदार अग्निमित्रा पॉल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

https://twitter.com/ANI/status/2052995475654267175

11:50 (IST) 9 May 2026

West Bengal CM Suvendu Adhikari oath ceremony LIVE updates: मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले भाजपाचे नेते दिलीप घोष यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांचे नाव चर्चेत होते. त्या दिलीप घोष यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

https://twitter.com/ANI/status/2052995091208564820

11:41 (IST) 9 May 2026

West Bengal CM Suvendu Adhikari oath ceremony LIVE updates: पंतप्रधान मोदींनी रवींद्रनाथ टागोर यांना वाहिली आदरांजली

सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहिली.

11:37 (IST) 9 May 2026

West Bengal CM oath ceremony Live Updates: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित

सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी विविध राज्याचे भाजपाचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती.

11:21 (IST) 9 May 2026
पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी थोड्याच वेळात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, पंतप्रधान मोदींचीही सोहळ्याला हजेरी

पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा थोड्याच वेळात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते यासाठी उपस्थित राहिले आहेत.

https://twitter.com/ANI/status/2052982090585751641

10:30 (IST) 9 May 2026

जोसेफ विजय यांच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नात खोडा; पाठिंब्याचे बनावट पत्र राज्यपालांना दिल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार

Joseph Vijay TVK Government Formation: तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. टीव्हीकेला पाठिंबा देणाऱ्या एएमएमके या पक्षाच्या प्रमुखांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. ...सविस्तर बातमी
10:17 (IST) 9 May 2026

West Bengal CM oath ceremony Live Updates: सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड

’पश्चिम बंगालमधील भाजपच्या प्रचाराचा चेहरा म्हणून उदयास आलेले ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यामुळे ते बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

’बंगालमध्ये अधिकारी यांचा शपथविधी सोहळा शनिवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार आहे.

10:15 (IST) 9 May 2026

Tamil Nadu Government Formation Live Updates: दोन पक्षांनी भूमिका बदलल्यामुळे तमिळनाडूत सत्ता स्थापनेत विलंब

तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक १०८ जागा जिंकून विजय यांचा ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) हा सर्वात मोठा पक्ष ठरला.  मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक ११८ च्या बहुमताच्या आकड्यापासून हा पक्ष दूर होता. टीव्हीकेला बहुमतासाठी १० जागांची आवश्यकता होती. काँग्रेस, माकप व भाकप यांनी पाठिंबा दिल्याने ‘टीव्हीके’ बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. मात्र आता VCK आणि AMMK पक्षाने भूमिका बदलल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

Joseph Vijay TVK party majority struggle in Tamil Nadu | VCK Chief Thol Thirumavalavan meeting MK Stalin | जोसेफ विजय तामिळनाडू सत्तास्थापना पेच | तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ मुख्यमंत्री

तामिळनाडूत सत्तेचे गणित बिघडले, विजय यांच्या अडचणीत वाढ (Photo: ANI)