Tamil Nadu Exit Poll 2026 Stalin vs Vijay, TVK Impact & Party-wise Trends: तमिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान संपन्न झाले. एकाच टप्प्यात झालेल्या निवडणुकीत जवळपास ४.८७ कोटी मतदारांनी मतदान केले. एक्झिट पोलनुसार तमिळनाडूमध्ये डिएमके – काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पिपल्स पल्स आणि मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार तमिळनाडूमध्ये डिएमके – काँग्रेस आघाडीला – १२५ ते १४५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर, एनडीएला ७० ते १०० जागा मिळतील असे समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार दिसत आहे. दरम्यान, अॅक्सिस माय इंडियाने राज्यात अभिनेता विजयच्या पक्षाला ९८ ते १२० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
पिपल्स पल्स
डिएमके – काँग्रेस आघाडीला – १२५ ते १४५ जागा
एनडीएला – ६५ ते ८० जागा
टीव्हीकेला – १८ ते २४ जागा
इतर – २ ते ६ जागा
मॅट्रिझ
डिएमके – काँग्रेस आघाडीला – १२२ ते १३२ जागा
एनडीएला – ८७ ते १०० जागा
टीव्हीकेला – १० ते १२ जागा
इतर – ० ते ६ जागा
अॅक्सिस माय इंडिया
डिएमके – काँग्रेस आघाडीला – ९२ ते ११० जागा
एनडीएला – २२ ते ३२ जागा
टीव्हीकेला – ९८ ते १२० जागा
इतर – ० जागा
पी- मार्क
डिएमके – काँग्रेस आघाडीला – १२५ ते १४५ जागा
एनडीएला – ६५ ते ८५ जागा
टीव्हीकेला – १६ ते २६ जागा
इतर – १ ते ६ जागा
जेव्हीसी
डिएमके – काँग्रेस आघाडीला – ७५ ते ९५ जागा
एनडीएला – १२८ ते १४७ जागा
टीव्हीकेला – ८ ते १५ जागा
इतर – ० जागा
कामाख्या एनालिटीक्स
डिएमके – काँग्रेस आघाडीला – ७८ ते ९५ जागा
एनडीएला – ६८ ते ८४ जागा
टीव्हीकेला – ६७ ते ८१ जागा
इतर – ० जागा
तमिळनाडूमध्ये ४०२३ उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे. राज्यात यावेळी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. डीएमके, एआयएडीएमके आणि विजय यांच्या टीव्हीके यांच्यातील तिरंगी लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. २३४ विधानसभा जागांच्या या राज्यात बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे.
मतदानाची आकडेवारी
तमिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठीचे मतदान संपन्न झाले. तामिळनाडूमध्ये ८४.६९ टक्के मतदारांनी मतदान केले, ज्यात ८३.५७ टक्के पुरुष, ८५.७६ टक्के महिला आणि ६०.४९ टक्के तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, तामिळनाडूच्या एकूण ५७.३ दशलक्ष मतदारांमध्ये २८ दशलक्ष पुरुष मतदार, २९.३ दशलक्ष महिला मतदार आणि ७,७२८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
अभिनेता विजय ठरणार निर्णायक
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला दुसऱ्यांदा सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक दशकांपासून, तामिळनाडूच्या निवडणूक राजकारणात प्रामुख्याने द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) यांच्यात आलटून पालटून सत्तांतर होत आले आहे. मात्र, अभिनेता विजय आणि त्यांच्या टीव्हीके पक्षाच्या प्रवेशामुळे या लढतीचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.
