Tamil Nadu and West Bengal Political Crisis : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तमिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी नैतिक विजय आपलाच झाल्याचं सांगत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय जोसेफला पाठिंब्यासाठी संख्याबळ अपुरं पडत असताना रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालं आहे. अण्णा द्रमुकच्या काही आमदारांना एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच, विजय पुन्हा एकदा राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे.
Tamil Nadu Political Crisis Live| West Bengal Government Formation : सुवेंदू अधिकारींच्या पीएची हत्या, पश्चिम बंगालमध्ये निकालोत्तर घडामोडी हिंसक वळणावर!
राज्यपालांकडून पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित; ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ केले बरखास्त
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपाल आर. एन. रवी यांनी मोठी कारवाई केली आहे. आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत राज्यपालांनी ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे.
राज्यपाल आर.एन. रवी यांनी संविधानातील अनुच्छेद १७४(२)(बी) चा वापर करून हे पाऊल उचलले आहे. त्यांनी ७ मे २०२६ पासून पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोलकाता येथील लोकभवनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यपालांनी विधानसभा विसर्जित करण्याचे आदेश दिले असून, याची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
Tamil Nadu Political Crisis Live: काँग्रेस पक्ष तमिळनाडूच्या राज्यपालांविरोधात आंदोलन करणार
भाजपाप्रणीत केंद्र सरकार आणि तमिळनाडूच्या राज्यापालांनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पक्षाला सत्तास्थापनेपासून दूर ठेवण्याचा घटनाविरोधी निर्णय घेतला, असा आरोप करत तमिळनाडू काँग्रेसने शुक्रवारी ८ मे रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
"तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू करा", ZOHO चे प्रमुख श्रीधर वेंबु यांची मागणी; राज्यपालांच्या भूमिकेचा दिला दाखला
विजय यांचना पाठिंबा असणाऱ्या आमदारांची संख्या वाढत नाहीये. या सगळ्यातून जे काही सरकार अस्तित्वात येईल, ते अस्थिर असेल. तामिळनाडूला याहून चांगला पर्याय हवाय. या परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून पुन्हा निवडणुका घेतल्या जाणे हाच योग्य मार्ग आहे. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारे पैशांच्या वाटपावर कठोर बंदी राबवायला हवी. त्यानंतरच कुणाला जनतेचा खरा कौल आहे ते समजेल - श्रीधर वेंबु
व्हीसीकेचे प्रमुख थोल तिरुमावलवन म्हणाले, “राज्यपालांना विजय यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्यापूर्वी त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ किंवा ११८ आमदारांचे स्पष्ट बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. लोकांनी दिलेला कौल लक्षात घेता, त्यांनी प्रथम मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी. त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करणे ही त्यांची जबाबदारी ठरते. मी राज्यपालांना विनंती करतो की, लोकांचा कौल आणि त्यांचा घटनात्मक अधिकार लक्षात घेऊन टीव्हीके अध्यक्ष जोसेफ विजय यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करावे. विजय यांनी धर्मनिरपेक्ष सरकार स्थापनेसाठी व्हीसीके आणि डाव्या पक्षांना पाठिंबा देण्याची विनंतीही केली आहे. त्यांच्या विनंतीच्या आधारे आम्ही पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबतचे फायदे-तोटे चर्चा करून निर्णय घेऊ. पण माझ्या मते, हा जनतेचा कौल असल्याने त्यांनी सरकारची सूत्रे हाती घ्यावीत.”
पिग्मी एजंटांचे कमिशन कमी करण्याच्या निर्णयाविरोधात पतसंस्थांमध्ये असंतोष; सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशन आक्रमक
ओव्हरटेक केलं, गाडीचा वेग कमी केला अन् झाडल्या गोळ्या; सुवेंदू अधिकारींच्या PA ची हत्या कशी झाली? थरारक घटनाक्रम समोर
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री मध्यमग्राम या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपींचा शोध पोलीस घेत असून पुढील कारवाई करत आहेत.
सुवेंदू अधिकारींच्या पीएची हत्या; भाजपाचा ‘टीएमसी’ला मोठा इशारा; ‘हिंसाचार, दहशत सहन केली जाणार नाही’
भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवत मोठा विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचा दारूण पराभव करून आता भाजपा पश्चिम बंगालमध्ये लवकरच सरकार स्थापन करणार आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांचा पराभव होऊन देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. असं असतानाच बंगालमध्ये अनेक ठिकाणी भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळी सारख्या हिंसाचारांच्या घटना घडल्या आहेत.
२०० पेक्षा जास्त FIR दाखल, ४०० जणांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय?
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला मोठा धक्का दिला. मात्र, टीएमसीच्या पराभवानंतर भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याने अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. एवढंच नाही तर या निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता या हिंसाचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आल्याची माहिती बंगालच्या प्रभारी पोलीस महासंचालकांनी दिली आहे.
जयगड बंदरातून काजू-हापूस, मत्स्य निर्यातीला गती; पायाभूत सुविधा तातडीने उभारण्याच्या सूचना
DMK on Vijay Swaring-in: द्रमुक पक्षाची भाजपाच्या राज्यपालांवर टीका, विजयच्या शपथविधीवर दिली प्रतिक्रिया
तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी टीव्हीके प्रमुख विजय यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण न दिल्याबाबत प्रतिक्रिया देताना द्रविड मुनेत्र कळघम (DMK) चे प्रवक्ते सरवनन अण्णादुरई म्हणाले,
“... या प्रकरणात तामिळनाडूमध्ये कोणतीही निवडणुकीपूर्व आघाडी बहुमत मिळवू शकलेली नाही. सरकार स्थापन करण्यासाठी कुणीही दावा केलेला नाही. मात्र सर्वात मोठा पक्ष असलेल्या विजय यांच्या टीव्हीकेने पुढाकार घेत राज्यपालांची भेट घेतली आणि ११३ आमदारांचा पाठिंबा असल्याचे दाखवले. त्यांना ११३ आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा ११७ आहे. म्हणजेच ते बहुमतापासून चार जागांनी कमी आहेत. पूर्णपणे घटनात्मक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिले, तर राज्यपालांना पाठिंब्याचा पुरावा मागण्याचा किंवा इतर सदस्यांकडून समर्थनपत्रे मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, ज्यामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठता येईल. सर्वोच्च न्यायालयाने रमेश्वर प्रसाद प्रकरणात हेच निरीक्षण नोंदवले होते. हीच ती एकमेव बाब आहे जिथे राज्यपालांना काही प्रमाणात निर्णयस्वातंत्र्य वापरण्याची मुभा आहे. संविधानाने त्यांना तो अधिकार दिला आहे. कदाचित राज्यपाल त्याच अधिकाराचा वापर करत असावेत. भाजपच्या राजवटीत राज्यपाल कसे काम करतात हे आपल्याला आणि सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे नेमके काय घडत आहे याचा अंदाज कुणीही लावू शकतो. मात्र त्याव्यतिरिक्त आमचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, विजय मुख्यमंत्री होण्यामध्ये डीएमके पक्ष कोणताही अडथळा आणणार नाही. आम्हाला कोणतेही घटनात्मक संकट नको आहे. त्यांनी हे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे...”
Sanjay Raut on Vijay Swearing In - संजय राऊतांची विजयच्या शपथविधीवर प्रतिक्रिया, भाजपाला केलं लक्ष्य
भाजपाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. सर्वात मोठा पक्ष ठरूनही त्यांनी टीव्हीकेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे घटनात्मकदृष्ट्या चुकीचं आहे. टीव्हीकेला १०८ जागा मिळूनही तुम्ही त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. भाजपानं देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेत. कुणी धोतर नेसलंय तर कुणी सुटा-बुटात आहेत - संजय राऊत</p>
आरक्षित सीटच गायब! रत्नागिरी-पुणे एसटीतील भोंगळ कारभारामुळे प्रवाशांचा खोळंबा
Vijay Swearing-in Ceremoney: विजयचा शपथविधी आज होणार नाही!
आज विजयचा शपथविधी होणार या आशेपोटी मोठ्या संख्येनं चेन्नईच्या नेहरू इंदूर स्टेडियमबाहेर समर्थकांची गर्दी जमली होती. पण अद्याप सत्तास्थापनेचा तिढा सुटला नसल्यामुळे समर्थकांना माघारी परतावं लागलं आहे.
Assam Government Formation: आसाम सरकारचा शपथविधी १२ मे रोजी
आसाम सरकारचा शपथविधी १२ मे रोजी
Vijay Government Formation: विजयला घटनेनुसार सत्तास्थापनेस पाचारण करायला हवं - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकरांनी घटनेतील तरतुदी आणि देशातील आधी घडलेल्या घटनांचा संदर्भ देत विजयला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण द्यायला हवं, असं मत मांडलं आहे.
https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/2052246458154569989
लातूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सुखवार्ता, निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही आशा पल्लवित
व्याकरणाच्या दडपणाशिवाय भाषा शिकता आली पाहिजे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांचे प्रतिपादन
Suvendu Adhikari PA Murder: सुवेंदु अधिकारींच्या पीएच्या हत्येवर काँग्रेसचा संताप
सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येवर काँग्रेसचा संताप, कपिल सिब्बल यांनी एक्स पोस्टवरून व्यक्त केली भूमिका, म्हणाले, "सुवेंदू अधिकारींच्या पीएची हत्या...राजकारणात हिंसेला कोणतीही जागा नाही".
DMK and AIADMK weigh Alliance: सर्वाधिक जागा जिंकूनही विजयचा TVK सत्तेपासून दूर; काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी द्रमुक व अण्णाद्रमुकची युती?
DMK and AIADMK weigh Alliance: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांचा टीव्हीके (TVK) पक्ष १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमताचा ११७ हा आकडा गाठताना त्यांची दमछाक होत आहे.
तमिळनाडूत मोठी राजकीय घडामोड; जोसेफ विजय यांचा शपथविधी लांबणीवर का पडला? राज्यपालांनी कोणते पुरावे मागितले?
Tamil Nadu Government Formation Live : विजय पुन्हा राज्यपालांच्या भेटीला
विजय जोसेफ आज पुन्हा एकदा राज्यपालांच्या भेटीला गेला असून त्याने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे टीव्हीके पक्षाचे १०८ (विजय दोन मतदारसंघांतून निवडून आला असून त्यापैकी एकाचा राजीनामा दिल्यानंतर ही संख्या १०७ होणार), काँग्रेसचे पाच आमदार आणि नव्याने चर्चा होत असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या ३० आमदारांच्या पाठिंब्यावर विजयनं सत्तास्थापनेचा दावा केला असल्याची चर्चा आहे.
Tamil Nadu Government Formation Live : तामिळनाडूत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
अण्णाद्रमुक पक्षात विजयला सत्तेसाठी पाठिंबा देण्यावरून फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली असून रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे. अण्णाद्रमुकच्या काही आमदारांना ममल्लापुरममधील आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या आमदारांचा विजयला पाठिंबा असून त्यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली टीव्हीके पक्षानं सुरू केल्या आहेत.
Tamil Nadu Government Formation Live : तामिळनाडूत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
विजयच्या टीव्हीके पक्षानं १०८ जागा जिंकत तामिळनाडूतील सत्तेची गणितं बदलली आहेत. पहिल्यांदाच तामिळनाडूमध्ये द्रमुक किंवा अण्णाद्रमुक या दोन पक्षांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या पक्षाचं सरकार अस्तित्वात येणार आहे. शिवाय, करुणानिधी किंवा जयललिता यांच्याशी संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त नवीन व्यक्ती तामिळनाडूची मुख्यमंत्री होणार आहे.
Tamil Nadu Government Formation Live : तामिळनाडूत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
अभिनेता विजय जोसेफनं तामिळनाडूमध्ये दोन्ही प्रस्थापित पक्षांना दणका दिल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी काँग्रेसच्या पाच आमदारांनी विजयच्या TVK पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर विजयनं राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. पण अजूनही ११८ जागांचा बहुमताचा आकडा विजयला गाठता आलेला नाही.
