तेहलकाचा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याला उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्याने आता जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी तेजपालला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली असून सध्या तो सडा येथील उपकारागृहात आहे. तेजपालच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवडय़ामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे.
तेजपालचा जामीन अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला, असे त्याचे वकील संदीप कपूर यांनी येथे सांगितले. तेजपालविरोधातील सुनावणी दोन महिन्यांत सुरू होण्याचे कारण देत उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

Story img Loader