तारुषी जैनचा मृतदेह आज भारतात आणणार

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, हा अनैसर्गिक मृत्यू असून काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.

बांगलादेशातील ढाका येथील होली आर्टिसन बेकरी येथे शुक्र वारी रात्री झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या तारूषी जैन या मुलीचा पार्थिव देह सोमवारी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, हा अनैसर्गिक मृत्यू असून काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. तारूषीचा पार्थिव देह सोमवारी विमानाने दिल्लीला आणला जाईल. तारूषीचे वडीलही समवेत येणार आहेत. नंतर तो फैजाबादला नेऊन अंत्यसंस्कार करण्यात येतील. तारूषीचे वडील बांगलादेशात गेली १५-२० वर्षे कपडय़ांचा उद्योग करतात. तारूषी ही अमेरिकेतील बर्कले येथे शिकत होती व सुटीसाठी ढाक्यात वडिलांकडे आली असता दहशतवादी हल्ल्यात मरण पावली. स्वराज यांनी  म्हटले की, देश तारूषी जैन हिच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, तिच्या कुटुंबीयांना व्हिसा दिला जाईल.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tarushi jain 19 who had gone to meet her family killed in dhaka