Tata Advanced Systems to build Rafale fighter fuselages in India with Dassault Aviation : राफेल लढाऊ विमानांसाठी लागणारे महत्त्वाचे भाग आता टाटा समूहाकडून भारतात तयार केले जाणार आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स ही राफेल लढाऊ विमान फ्यूजलेज (fuselage) चे उत्पादन करणार आहे. याकरिता दसॉल्ट एव्हिएशनबरोबर चार प्रॉडक्शन ट्रान्सफर करार केले असल्याची माहिती गुरूवारी कंपनीने दिली आहे. हे उत्पादन भारतीय तसेच जागतिक बाजारपेठांसाठी केले जाणार असून यामुळे सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना मिळणार आहे. हे भारताच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमता मजबूत करणे आणि जागतिक पुरवठा साखळीला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल असणार आहे.
या दोन कंपनीच्या भागीदारातून राफेलचे प्रमुख स्ट्रक्चरल सेक्शन भारतात तयार करण्याच्या उद्देशाने टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स एक अत्याधुनिक कारखाना हैदराबाद येथे उभारणार आहे. फ्यूजलेजचे मागीस शेल, राफेलचा मागचा संपूर्ण भाग, सेंट्रल फ्यूजलेज आणि पुढचा भाग यांचे उत्पादन भारतात केले जाणार आहे.
विशेष म्हणडे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दसॉल्ट एव्हिएशनबरोबर झालेल्या कराराबद्दल माहिती दिली आहे. विशेष बाब म्हणजे या विमानांचे असे भाग पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर बनवले जाणार आहेत.
Precision meets partnership ✈️⚙️
— Tata Advanced Systems Limited (@tataadvanced) June 5, 2025
Dassault Aviation partners with Tata Advanced Systems to manufacture Rafale fighter aircraft fuselage for India and other global markets.#TataAdvancedSystems #DassaultAviation #Rafale #MakeInIndia #Aerospace #DefenceManufacturing… pic.twitter.com/MDLIOzXwxx
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील निर्मिती कारखान्यातून आर्थिक वर्ष २०२७-२८मध्ये पहिले फ्यूजलेज सेक्शन्स तयार होऊन बाहेर पडतील. तसेच या कारखान्यातून दर महिन्याला दोन पूर्ण झालेल्या फ्यूजलेजचा पुरवठा केला जाईल. तसेच या कारखान्यातून भारतासह जगभरातील मल्टी-रोल कॉम्बॅट विमानांच्या बाजारपेठेसाठी पुरवठा केला जाईल.
भारतीय हवाई दलाकडे आधीपासूनच ३६ राफेल विमाने आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या ६३ कोटींच्या कराराअंतर्गत भारतीय नौदलाच्या ताफ्यात २६ राफेल मरीन जेट्सचा समावेश करेल. या करारात तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि भारतात देखभाल आणि उत्पादन सुविधा उभारणे याचा देखील समावेश आहे. फ्रान्स आणि भारत यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक देशांच्या मागणीनुसार राफेल विमाने तैनात केली जातात, ज्यामध्ये इजिप्त, कतार, युएई, ग्रीस, इंडोनेशिया, क्रोएशिया आणि सर्बिया अशा देशांचा समावेश आहे.
दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स (TASL) यांनी भारतात राफेल फायटर एअरक्राफ्ट फ्यूजलेज भारतात तयार करण्यासाठी चार प्रॉडक्शन ट्रान्सफर करारांवर स्वाक्षरी केली आहे. ज्याच्या माध्यमातून देशाच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमता मजबूत करणे आणि जागतिक पुरवठा साखळ्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. ही सुविधा भारताच्या एअरोस्पेस पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या महत्त्वाची गुंतवणुक दाखवून देते आणि हाय-पर्सिजन मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करेल, असे दसॉल्ट आणि टीओएसएसने एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
राफेल फ्जूजलेज हे पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर तयार केले जातील. आमची भारतातील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल आहे. आमच्या स्थानिक पार्टनर्सचा विस्तार, भारातीय एअरोस्पेस उद्योगातील एक महत्त्वाचा घटक असलेले टीएएसएल यांच्यासह ही पुरवठा साखळी राफेलच्या वाढीसाठी हातभार लावेल आणि आमच्या पाठिंब्याने यातून गुणवत्ता आणि स्पर्धात्मक गरजा पूर्ण केल्या जातील, असे दसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ Eric Trappier यांनी यावेळी सांगितले.