खासगी शाळेतील एका शिक्षकाने दहावीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करून नंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याची घटना राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्य़ातील अशीद या गावात घडली. भुवनेश (वय ४२) असे या शिक्षकाचे नाव असून त्याने सोळा वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला, त्यामुळे ती गर्भवती राहिली असता त्याने तिला गर्भपात करायला लावले अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी भुवनेश याला अटक केली असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. त्याने ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भ पाडायला लावून तो त्या मुलीलाच शाळेच्या जवळ जमिनीत गाडायला लावला. दरम्यान, स्थानिक लोकांनी आरोपीवर कडक कारवाईसाठी निदर्शने केली.