मुंबईतून संधी हुकली; आता ‘येथून’ करणार विराट मतदान

मुंबईतून मतदान करण्याची विराटची इच्छा होती

देशभरात सध्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी विविध टप्प्यात मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. सर्व नागरिकांना मतदान करा, असे आवाहन निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्था यांच्याकडून केले जात आहे. पण या दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मात्र यंदाच्या मतदानालाही मुकणार अशी माहिती देण्यात येत होती. पण आता विराट कोहली १२ मे रोजी गुरुग्राम येथे मतदानाचा हक्क बजावणार आहे. सोमवारी २९ एप्रिलला दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदान करण्याची त्याची इच्छा होती. पण दिलेल्या कालावधीत अर्ज न केल्यामुळे त्याला मुंबईतून मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे समजत आहे.

विराट यंदाच्या लोकसभा मतदानाला मुकणार अशा बातम्या प्रसारमाध्यमानी दिल्यांनतर विराटने आपल्या इंस्टाग्रामवरून याबाबत स्पष्ट केले आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर आपले मतदान ओळखपत्र पोस्ट केले. तसेच आपण १२ तारखेला गुरुग्राम येथून मतदान करणार आहोत, असे सांगितले. याशिवाय आणखी एक फोटो पोस्ट करत त्याने ‘तुम्ही (नागरिक) सगळे मतदानाला तयार आहात का?’ असा प्रश्नही विचारला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले होते. त्यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली आदींचा समावेश होता.

या ट्विटचा मान राखत देशात १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी क्रिकेटपटू व सेलिब्रिटी तसेच कलाविश्वातील व्यती पुढाकार घेत आहेत आणि नागरिकांना आवाहन करत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेदेखील नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नागरिकांना मतदान कराच असा संदेश दिला होता.

इतकेच नव्हे तर यंदा आमच्या घरातून फक्त मी आणि पत्नी अंजलीच नव्हे तर सारा आणि अर्जुनदेखील यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत, असे सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Team india captain virat kohli to vote from gurugram on 12th may shares instagram story

ताज्या बातम्या