West Bengal Election: क्रिकेटर मनोज तिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल!

भारतीय क्रिकेट मनोज तिवारीने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

manoj tiwari joins tmc
फोटो सौजन्य – एएनआय

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हुगळीमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मनोज तिवारीचा पक्षप्रवेश झाला. विधानसभा निवडणुकांमध्ये मनोज तिवारीला देखील तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून एका स्टार कॅम्पेनरचा तृणमूलमध्ये समावेश झाल्यामुळे पक्षाला त्याचा फायदा मिळू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. मनोज तिवारीने २००८मध्ये भारताकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर त्याने भारतासाठी शेवटचा सामना जुलै २०१५मध्ये खेळला होता. IPL मध्ये देखील मनोज तिवारीने कोलकाता नाईट रायडर्सकडून आपल्या खेळाची चमक दाखवली होती.

 

आपल्या पक्षप्रवेशाआधी मनोज तिवारीने एक ट्वीट करून जनतेकडून पाठिंबा मिळण्याचे आवाहन केले होते. ‘आजपासून एक नवा प्रवास सुरू होत आहो. तुम्हा सर्वांचा पाठिंबा आणि प्रेम हवंय’, असं त्याने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच इथून पुढच्या राजकीय अपडेट्ससाठीच्या त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलची लिंक देखील त्याने या ट्वीटसोबत जोडली आहे.

 

आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मनोज तिवारीने आत्तापर्यंत १२ एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Team india cricketer manoj tiwari joins tmc before west bengal elections pmw

ताज्या बातम्या