उत्तर प्रदेशातून भावाला भेटण्यासाठी निघालेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर स्लीपर कोच बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बस चालक आणि कंडक्टर यांनी या मुलीला बसमध्ये बसवलं आमि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी काश्मीर गेट पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आता पोलिसांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत काय सांगितलं?
१७ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही ४ ऑगस्टच्या रात्री घडली. आम्ही या प्रकरणात पुरावे गोळा करत आहोत. तसंच बसमध्ये सापडलेले कपडे, इतर नमुने हे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये केसांचा तसंच वीर्याचा समावेश आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी असंही सांगिलं की या मुलीला बख्तावारपूर भागात मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं आणि तिच्यावर ड्रायव्हर आणि कंडक्टर अशा दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. या मुलीने परी चौकातून ही बस पकडली होती. तिला हे माहीत नव्हतं की बसमध्ये कुणी नाही कारण बसचे पडदे बंद होते. या मुलीने ड्रायव्हरला आणि कंडक्टरला हे सांगितलं की तिला सेक्टर ६३ ला जायचं आहे. त्यावेळी त्या दोघांनी आम्हीही त्याच भागात जात आहोत असं सांगितलं. जेव्हा ही मुलगी बसमध्ये बसली तेव्हा तिला हे काही वेळातच लक्षात आलं की बसमध्ये तिच्याशिवाय कुणीही नाही. पोलिसांनी हे सांगितलं की यानंतर या मुलीने बसमधून उतरण्याचा प्रयत्न केला पण कंडक्टरने तिला मागे खेचलं. यानंतर ही बस बख्तावारपूरच्या दिशेने गेली आणि त्याच ठिकाणी धावत्या बसमध्ये या मुलीवर बलात्कार करण्यात आला.
त्या बसचा त्या रात्री ४७ किमी प्रवास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री बसने सुमारे ४७ किमी प्रवास केला. काश्मिरी गेट या भागात या मुलीला बलात्कारानंतर फेकण्यात आलं. त्याआधी ही बस ४७ किमी प्रवास करुन आली होती. याच प्रवासादरम्यान चालत्या बसमध्ये या मुलीवर ड्रायव्हर आणि कंडक्टरने आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणात ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तर बसही जप्त करण्यात आली असून बसची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येते आहे. ही बस कुठल्या भागांतून गेली त्याचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासलं आहे. तसंच सगळ्या प्रकारचे पुरावेही गोळा करण्यात येत आहेत. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं
