मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पॉर्न पाहून लहान मुलांमध्ये गुन्हे करण्याचे प्रकार वाढले आहेत. कमी वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन लागल्यामुळे त्यावर ते काय पाहतात, यावर आता कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. रिवा जिल्ह्यात मोबालइवर पॉर्न पाहण्याचे व्यसन लागलेल्या एका १३ वर्षीय मुलाने आपल्या ९ वर्षांच्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर याची तक्रार आता वडिलांना करू असे बहिणीने सांगितल्यानंतर घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने गळा दाबून बहिणीची हत्या केली. याहून संतापजनक घटना म्हणजे सदर गुन्हा लपविण्यासाठी अल्पवयीन आरोपीची आई आणि दोन मोठ्या बहिणींनी पुरावे नष्ट करून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांचा कांगावा हाणून पाडला. सदर घटना २४ जुलै रोजी घडली. भावाने लैंगिक अत्याचार करून बहिणीचा खून केल्यानंतर आई आणि दोन मोठ्या बहिणीने गुन्हा लपविण्यासाठी आटापिटा केला. सुरुवातीला त्यांनी मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करून काहीतरी किडा चावल्यामुळे ती बेशुद्ध पडल्याचे सांगतिले. मात्र खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सरकारी रुग्णालयात जाताच तिथल्या डॉक्टरांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून झाल्याचे सांगितले. हे वाचा >> CCTV: बंगळुरूतील ‘त्या’ धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फूटेज व्हायरल; पीजी हॉस्टेलमध्ये घुसून २२ वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या! सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तपास सुरू झाला. शवविच्छेदन अहवालातूनही लैंगिक अत्याचार आणि गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरीष्ठ पोलिसांचे एक चौकशी पथक तयार केले आणि गंभीरतेने प्रकरणाची चौकशी केली. आरोपी कसे पकडले गेले? रिवा जिल्ह्यातील जावा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या या गावात हत्या झालेल्या कुटुंबात चार मुली, एक मुलगा आणि आई-वडील असे सहा जण राहत होते. रात्रीच्या वेळी घराच्या मोकळ्या व्हरांड्यात १३ वर्षांचा अल्पवयीन आरोपी आणि ९ वर्षांची बहिण झोपत असत. तर इतर सदस्य दुसऱ्य खोल्यांमध्ये झोपत असत. रात्रीच्या वेळेस अल्पवयीन भावाने सदर गुन्हा केला. या प्रकरणी पोलिसांनी ५० लोकांचा जबाब नोंदविला. प्रत्येकाच्या बोलण्यातून कुटुंबियांकडेच संशय जात होता. यासाठी काही न्यायवैद्यक पुरावेदेखील गोळा केले. यानंतर कुटुंबियांची कसून चौकशी केली. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या कुटुंबियांनी नंतर आपला गुन्हा मान्य केला. हे ही वाचा >> “पॉर्न व्हिडीओ पाहून शाळकरी मुलांनी आठ वर्षांच्या चिमुकलीशी…”, असं उकललं मुलीच्या हत्येचं गूढ पॉर्न व्हिडीओच्या आहारी जाऊन दुष्कृत्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला पॉर्न पाहण्याचे व्यसन जडले होते. ते पाहून त्याने आपल्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. बहिणीने वडिलांकडे याची तक्रार करणार असल्याचे सांगताच घाबरलेल्या भावाने तिचा गळा दाबून खून केला. बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर मुलाने याची माहिती आईला दिली. यानंतर आई आणि दोन मोठ्या बहिणींनी मिळून भावाला वाचविण्यासाठी आणि गावात बदनामी होऊ नये, या भीतीने गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच छडा लावत चारही जणांना अटक केली.