झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका १६ वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली आहे. वडिलांशी झालेल्या भांडणानंतर मुलाने टोकाचं पाऊल उचललं. वडिलांवर हल्ला करून मुलगा तिथून पळून गेला. या मुलाच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला घरातून बाहेर काढलं होतं. त्यामुळे मुलाचं आणि वडिलांचं मोठं भांडण झालं. या भांडणादरम्यान मुलाने चाकू भोसकून वडिलांची हत्या केली आणि तिथून पळून गेला.

छोटू शर्मा असं मृत पित्याचं नाव असून ते पलामूतल्या प्रक्रिया गावातील रहिवासी होते. दरम्यान, नवाजयपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, या घटनेच्या आदल्या दिवशी छोटू शर्मा यांनी पत्नीशी भांडण केलं होतं. तसेच पत्नीला जबर मारहाण करून तिला घरातून हाकलून दिलं होतं. वडिलांच्या या कृत्यामुळे मुलगा संतापला आणि वडिलांशी वाद घातला. दोघांमध्ये भांडण सुरू होतं. तेव्हा मुलाने वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली. वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात तिथेच टाकून तो तिथून पळून गेला.

IAS officer wife rape case
सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा सावत्र मुलगा व जावयावर बलात्काराचा आरोप; म्हणाली, “मला बांधून…”
Crime news baghpat murder
मुलीच्या प्रियकराला तिच्या कुटुंबानेच संपवलं, व्हिडीओ कॉल करुन बोलवलं आणि…
Bhiwandi, girl, sexually assaulted,
नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, भिवंडीत धक्कादायक प्रकार
mumbra Killing of young woman
ठाणे: अनैतिक संबंधातून तरुणीची हत्या
court sentence life imprisonment till death for molesting minor girl zws
अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार; शेजाऱ्याला मृत्यूपर्यंत जन्मठेप तर आजोबाला १० वर्षे सक्तमजुरी
murder in Ichalkaranji murder of minor boy in ichalkaranji
इचलकरंजीत अल्पवयीन मुलाचा खून; चौघेजण ताब्यात
newborn baby girl killed by father
नवजात जुळ्या मुलींचा वडिलांकडून खून; मुलाच्या हव्यासापोटी क्रूर कृत्य
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”

हे ही वाचा >> बाइकरने कारच्या डिकीला वारंवार दिली धडक; संतापलेल्या कारचालकाने भररस्त्यात…; धक्कादायक Video व्हायरल

आरोपीच्या चुलत भावाने आरोपीला त्याच्या वडिलांना चाकूने भोसकताना पाहिलं आणि आरडाओरड केली. त्यानंतर आजूबाजूचे लोक घरात जमले. तोवर आरोपी तिथून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.