जगातील सर्वात महागडं शहर कोणतं? पॅरिस किंवा लंडन नाही, तर…!

जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीमध्ये पॅरिस आणि सिंगापूर दुसऱ्या स्थानी आहेत, तर झुरिच तिसऱ्या स्थानी आहे.

tel aviv city
जगातलं सर्वात महागडं शहर! ( Photo : Tel Aviv City / facebook )

आधुनिकता, श्रीमंती किंवा उच्च राहणीमान या सगळ्या गोष्टींवरून जगातलं सर्वात महागडं शहर कोणतं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन वगैरे येऊ शकतं. पण आपल्या या सगळ्या अंदाजांना बाजूला सारत अनपेक्षितपणे एक वेगळंच शहर जगातलं सर्वात महाग शहर ठरलं आहे. वर्ल्डवाईड कॉस्ट लिव्हिंग इंडेक्स हा अहवाल इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं तयार केला असून त्यामध्ये यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे सर्वात महाग ठरलेल्या शहरासमोर जगातील महासत्तांमधली शहरं देखील फिकी पडली आहेत!

इस्त्रायलमधलं तेल अविव हे शहर जगातलं सर्वात महागडं शहर ठरलं आहे. या अहवालातील निष्कर्षांनुसार, तेल अविवपाठोपाठ पॅरिस आणि सिंगापूर ही दोन शहरं संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर त्यामागे तिसऱ्या स्थानी झुरिच आणि चौथ्या स्थानी हँगकाँग आहे. हमखास महागडं वाटणारं न्यूयॉर्क या यादीमध्ये सहाव्या स्थानी तर जिविव्हा सातव्या स्थानी आहे. जिनिव्हापाठोपाठ आठव्या स्थानी कोपनहेगन, नवव्या स्थानी लॉस एंजेलिस आणि दहाव्या स्थानी जपानमधील ओसाका हे शहर आहे.

सर्वात स्वस्त शहर ठरलं….

दरम्यान, एकीकडे तेल अविव जगातलं सर्वात महागडं शहर ठरलेलं असताना दुसरीकडे सर्वात स्वस्त शहराची देखील चर्चा सुरू झाली आहे. दमास्कस हे शहर जगातलं सर्वात स्वस्त शहर ठरलं आहे.

तेल अविव महागडं शहर का?

आर्थिक विश्लेषकांच्या मते, इस्रायलमधील चलन असलेल्या शेकलची किंमत डॉलरच्या तुलनेत अधिक सक्षम झाल्यामुळे तेल अविव जगातलं सर्वात महाग शहर ठरलं असण्याची शक्यता आहे. तसेच, करोना काळानंतर वाहतूक, दळणवळण आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळेही हा फरक पडला असण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tel aviv from israel becomes worlds most expensive city paris second pmw

Next Story
एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी विकण्यासाठी मोदी सरकारचा हिरवा कंदील; २१० कोटींना व्यवहार ठरला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी