तेलंगणातील अपघातात महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

देवदर्शनासाठी जाताना हा अपघात झाला असल्याचीही माहिती मिळते आहे.

तेलंगणामध्ये टिपर ट्रक आणि ऑटो रिक्षा यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कुटुंब महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात राहणारे असल्याचे कळते. ते अदिलाबादच्या पोच्चम्मा मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. देवदर्शनासाठी जाताना हा अपघात झाला असल्याचीही माहिती मिळते आहे.
तेलंगणामधील अदिलाबाद जिल्ह्यातील देगाव गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री हा अपघात घडला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला आणि सात मुलांचा समावेश आहे. आदिलाबाद जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तरुण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भाइन्साच्या बाहेरील भागात घडलीय. टिपर ट्रक हा धान्यानं भरला होता. अपघातानंतर त्यातील सामानाचं वजन अंगावर पडल्याने १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारासाठी घेऊन जात असताना इतर दोघांनी आपला प्राण सोडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Telangana 15 of a family dead as auto rickshaw tipper collide