तेलंगणाचे भाजपा नेते ज्ञानेंद्र प्रसाद हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरी मृतवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना ज्ञानेंद्र यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्ञानेंद्र यांनी आत्महत्या केली असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. पण अद्याप यामागचे कारण समजले नसून ही खरचं आत्महत्या होती की हत्या याबाबतच तपास सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- कर्नाटकमध्ये आतापर्यंत पावसामुळे ७३ जणांचा मृत्यू

नाश्ता देण्यासाठी गेल्यानंतर उघडकीस आला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेंद्र प्रसाद हे सरलिंगमपल्ली मतदारसंघातून पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. सोमवारी त्यांच्या पीएनं नाश्ता देण्यासाठी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांनी खोलीच्या खिडकीतून पाहिले असता ज्ञानेंद्र प्रसाद खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

हेही वाचा- गुजरातमध्ये नदीत मगरीच्या हल्ल्यात एक जण मृत्युमुखी

गेल्या काही दिवसांपासून ज्ञानेंद्र त्यांच्या पेंटहाऊसमध्ये राहत होते

हैदराबाद येथील मियापूर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता घराच्या पेंटहाऊसमध्ये ज्ञानेंद्र प्रसाद पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला असून नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana bjp leader gnanendra prasad found dead at his residence dpj
First published on: 09-08-2022 at 11:16 IST