पीटीआय, हैदराबाद
तेलंगणा राज्याचे वार्षिक दरडोई उत्पन्न १ लाख २४ हजार रुपयांवरून ३ लाख १७ हजार रुपये इतके वाढले असून ते देशात सर्वाधिक आहे, असा दावा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी केला. तसेच राज्याचे सकल अंतर्गत उत्पादन गेल्या नऊ वर्षांमध्ये पाच लाख कोटींवरून वाढून १३ लाख कोटींपर्यंत गेले असल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री राव यांनी राज्याच्या विकासाची माहिती दिली.




तेलंगणाची निर्मिती २ जून २०१४ रोजी झाली होती. त्यासाठी तेलंगणा राष्ट्र समितीच्या माध्यमातून के सी राव यांनी दीर्घकाळ लढा दिला होता. त्यांनी सांगितले की, नऊ वर्षांपूर्वी तेलंगणाची वीज निर्मिती क्षमता ७ हजार ७७८ मेगावॅट इतकी होती, ती आता १८ हजार ४५३ मेगावॅट इतकी झाली आहे. देशातील अनेक मोठय़ा राज्यांच्या तुलनेत तेलंगणाची स्थिती कितीतरी चांगली आहे असे ते म्हणाले.