आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करणाऱ्या कोणत्याही पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर पाठिंबा दिला जाईल, असे वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी जाहीर केले. कोणती आघाडी केंद्रात सत्तेवर येईल हे मला माहीत नाही, मात्र आंध्र प्रदेश एकत्र ठेवणाऱ्यांना आमचा पाठिंबा राहील, असे जगनमोहन यांनी स्पष्ट केले. आंध्र प्रदेशचे विभाजन टाळण्याचा पक्षाचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.  लोकसभा निवडणूक निकालानंतर जगनमोहन यांचा पक्ष महत्त्वाची शक्ती म्हणून उदयास येतील असे भाकित वर्तवले जात आहे. राज्य विभाजनाच्या मुद्दय़ावरून त्यांनी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि तेलगु देशम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्यावर  टीका केली. ते दोघेही आंध्र एकत्र ठेवण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप रेड्डींनी केला.