“भाजपाच्या धर्मांध द्वेषपूर्ण वक्तव्यासाठी भारताने माफी का मागायची?”; तेलंगणाच्या मंत्र्यांचा सवाल | Loksatta

“भाजपाच्या धर्मांध द्वेषपूर्ण वक्तव्यासाठी भारताने माफी का मागायची?”; तेलंगणाच्या मंत्र्यांचा सवाल

भाजपा प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मदांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आखाती देशांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. या अवमान प्रकरणी तेलंगणाचे मंत्री के. टी. रामराव (KTR) यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपाकडून देण्यात आलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यांसाठी भारताने का माफी मागायची असा थेट सवाल केटीआर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर […]

“भाजपाच्या धर्मांध द्वेषपूर्ण वक्तव्यासाठी भारताने माफी का मागायची?”; तेलंगणाच्या मंत्र्यांचा सवाल
संग्रहित छायाचित्र

भाजपा प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मदांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आखाती देशांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. या अवमान प्रकरणी तेलंगणाचे मंत्री के. टी. रामराव (KTR) यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपाकडून देण्यात आलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यांसाठी भारताने का माफी मागायची असा थेट सवाल केटीआर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

के. टी. रामराव आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भाजपाने केलेल्या द्वेषपूर्ण धर्मांध वक्तव्यांसाठी भारताने देश म्हणून आंतरराष्ट्रीय समुहाची माफी का मागायची? यासाठी भारताने देश म्हणून माफी मागू नये, तर भाजपाने माफी मागावी. तुमच्या पक्षाने दिवसरात्र द्वेष पसरवल्याबद्दल भारतीयांची माफी मागितली पाहिजे.”

“भाजपा खासदार प्रज्ञा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन केलं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन धक्कादायक होतं. मला तुम्हाला आठवण करू द्यायची आहे की तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टीला होऊ देता त्याला तुम्ही मान्यता देत असता. वरिष्ठ नेतृत्वाकडून या द्वेषाला मिळणारं समर्थन मोठं नुकसान करेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : कचराकुंडीवरील मोदींचे फोटो लावण्याला जितेंद्र आव्हाडांचा विरोध, निषेध करत म्हणाले…

“भाजपाच्या चुकीची माफी भारत मागणार नाही, काँग्रेसचा हल्लाबोल”

काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी देखील मोदी सरकारच्या भूमिकेवरून टीकास्त्र सोडलं. चूक भाजपाने करायची आणि माफी भारताने का मागायची? असा प्रश्न त्यांनी विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“हा अपमान सहन करणार नाही, भारतीय वस्तू…”; प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी कुवेतमध्ये तीव्र पडसाद

संबंधित बातम्या

लालूप्रसाद यादव यांच्यावर आज सिंगापूरमध्ये शस्त्रक्रिया, मुलगी देणार किडनी; शेअर केला रुग्णालयातील फोटो
“जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
Suresh Abdul Video : खान सरांचा जुना व्हिडीओ व्हायरल; कडक कारवाईची काँग्रेसची मागणी
“मला माफ करा, मी हा शब्द…”, देवेंद्र फडणवीसांचं गुजरातमध्ये वक्तव्य
नायजेरियात मशिदीवर अंदाधुंद गोळीबार; इमामसहीत १२ जणांचा मृत्यू, तर १९ जणांचे अपहरण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
दिग्दर्शक रवी जाधव अडकला पुन्हा लग्नबंधनात; व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
पिस्त्याचे सेवन ‘या’ ५ त्रासांच्या वाढीला देते तुफान वेग; एका दिवसात किती व कसे पिस्ते खाणे आहे योग्य?
“महिलांनाही एकापेक्षा जास्त पती असण्याचा हक्क…” जावेद अख्तर यांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत वक्तव्य
पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?
Abu Dhabi T10 League 2022: डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सवर मात करून दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद