आई कोविड सेंटरमध्ये; अवघ्या पाच दिवसांच्या मुलीची जबाबदारी वडिलांवर

मुलीला करोनाची लागण होऊ नये म्हणून निर्णय

प्रातिनिधीक फोटो

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र हरपलं आहे. काही ठिकाणी जीवन मरणाच्या रेषेवर असलेल्या आपल्या स्वकियांना वाचवण्याची धडपड सुरु आहे. तर काही ठिकाणी आई वडिलांना करोनाची लागण झाल्याने लहान मुलांना सांभाळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना तेलंगाणातील सिकंदराबाद येथे घडली आहे. अवघ्या ५ दिवसांच्या मुलीची जबाबदारी वडिलांवर आली आहे. पत्नीला करोनाची लागण झाल्याने  मुलीला घेऊन कोविड रुग्णालयाबाहेर ते वाट पाहात आहेत. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

तेलंगाणातील २० वर्षीय क्रिष्णा हे पाच दिवसांपूर्वी वडील झाले. मात्र वडील होण्याचा आनंद काही क्षणच त्यांच्या चेहऱ्यावर राहिला. पत्नीला कोविड झाल्याने तिला उपचारासाठी तेलंगाणातील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलीला करोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मुलीला आईपासून लांब ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे पेशाने कामगार असलेले क्रिष्णा हे पुरते खचून गेले आहेत. मुलीचं रडणं आणि तिला दूध पाजण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.

७२ वर्षीय व्यक्तीला पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा तर दुसरा ‘कोव्हिशिल्ड’चा; राजेश टोपेंच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

मुलीची देखभाल करण्यासाठी क्रिष्णा यांची आई त्यांना मदत करत आहे. मुलीची भूक शमवण्यासाठी दूध पावडर पाण्यात टाकून पाजली जात आहे. क्रिष्णा हे तेलंगाणातील झहिराबाद येथे राहणारे आहेत. झहिराबाद हैदराबादपासून ११५ किमी लांब आहे. त्यामुळे त्यांनी घरी परतण्याऐवजी रुग्णालयाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नीने करोनावर मात केल्यानंतर एकत्र घरी जाण्याचा त्यांनी पक्का विचार केला आहे.

सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरचा करोनामुळे मृत्यू

पाच दिवसांची मुलगी कुणी चोरून नेईल अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यासाठी ते डोळ्यात तेल घालून मुलीसोबत राहात आहेत. आपली पत्नी लवकर बरी होईल आणि मुलीसोबत आपल्या गावी जाता येईल असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाबाहेर पत्नीची आतुरतेने वाट पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Telanganas secunderabad man waits outside with his 5 days old baby wife in covid ward rmt

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी