‘युद्ध नको’ कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचे राजीनामे!

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

रशियातील दूरचित्रवाणी वाहिनी ‘टीव्ही रेन’ला ‘युक्रेनवरील रशियाचे अतिक्रमण’ यावर आधारित वृत्तांकन बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर या वाहिनीने आपले प्रक्षेपणच बंद केले. या दूरचित्रवाणी वाहिनीच्या कर्मचारीवर्गाने ‘आम्हाला युद्ध नको’ असा अखेरचा कार्यक्रम प्रसारित करून त्यातच आपले राजीनामे दिले.

ही दूरचित्रवाणी वाहिनी रशियातील उदारमतवादी आणि स्वतंत्र विचारांची वाहिनी होती. या वाहिनीने युद्धाविरोधात आणि शांततेच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. या वाहिनीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या नतालिया सिंडेयेव्हा यांनी  ‘आम्हाला युद्ध नको’ असे निक्षून सांगितले. त्यानंतर सर्व कर्मचारी स्टुडिओच्या बाहेर निघून गेले.

त्यानंतर या वाहिनीने रशियन संगीतकार पायतोर इलिच तचैकोव्स्की यांच्या ‘स्वान लेक’ या एक बॅलेचे प्रक्षेपण सुरू केले. १९९१ मध्ये तत्कालीन सोव्हिएट रशियामध्ये जनतेत निर्माण झालेल्या प्रचंड असंतोष आणि निदर्शनांचे प्रक्षेपण, वृत्तांकन दाखवण्याऐवजी हाच बॅले दाखवण्यात आला होता. त्याची आठवण यानिमित्ताने या वाहिनीने करून दडपशाहीविरुद्ध अनोखा निषेध केला. समाजमाध्यमांवर हा प्रसंग प्रसारित झाला आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार रशियाच्या दूरसंचार नियंत्रकांनी टीव्ही रेनचे प्रक्षेपण या आठवडय़ाच्या प्रारंभीच थांबवले होते. या वाहिनीचे काही कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी देश सोडून निघून गेले आहेत. या वाहिनीचे अखेरचे वृत्तांकन प्रक्षेपण यू टय़ूबवर चाललेले असताना वरील प्रसंग घडला.

आशावादही..

या वाहिनीने गुरुवारी जाहीर केले की, क्रेमलिनच्या (रशियन प्रशासन) प्रचंड दबावामुळे आम्ही आमचे प्रक्षेपण अनिश्चित काळासाठी थांबवत आहोत.  सिंडेयेव्हा यांनी वाहिनीच्या वेबसाईटला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे, की आम्हाला सामर्थ्य लाभू दे. अशा परिस्थितीत आम्ही कसे काम करणार, आमची स्थिती समजून घ्या. आमची वाहिनी पुन्हा कार्यरत होऊन प्रक्षेपण सुरू करेल, अशी आम्हाला निश्चित आशा आहे.

हल्ला, आक्रमण, युद्ध या शब्दांना बंदी

रशियातील प्रसारमाध्यमांना फक्त अधिकृत सरकारी सूत्रांनी दिलेली माहितीच प्रसिद्ध करण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांना युक्रेनप्रश्नाचे वृत्तांकन करताना हल्ला, आक्रमण, युद्ध असे शब्द वापरण्यास बंदी करण्यात आली असल्याचे वृत्त ‘गार्डियन’ने लाटव्हियातील रशियन वृत्त वेबसाईट ‘मेडुझा’च्या हवाल्याने दिले आहे.