रशियाने युक्रेविरोधात पुकारलेलं युद्ध अद्यापही सुरु असून दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान रशियामधील रोमन अब्रामोविच (Roman Abramovich) यांनी युद्ध संपावं यासाठी पुढाकार घेतला असून दोन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये संवाद व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अनधिकृतपणे ते शांतीदूताची भूमिका निभावत आहेत. दरम्यान त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाठवलेलं हस्तलिखीत चिठ्ठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडे सोपवली असता ते संतापले.

द टाइम्सच्या वृत्तानुसार, रोमन अब्रामोविच यांनी पुतीन यांच्याकडे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी लिहिलेली चिठ्ठी सोपवली. यामध्ये झेलेन्स्की यांनी हे युद्ध संपवण्यासाठी आवाहन करताना देशातील परिस्थितीची माहिती दिली होती. मात्र ही चिठ्ठी पाहून पुतीन संतापले आणि म्हणाले “त्यांना सांगा, मी त्यांना ठोकून काढेन”.

Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
Russia Ukraine War PM Narendra Modi
पुतिन, झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा; लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण

युक्रेनने रोमन अब्रामोविच यांच्याकडे २४ फेब्रुवारीला सुरु झालेलं युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यात मदत करावी अशी विनंती केली होती. रोमन यांनी ही विनंती मान्य केली असून रशियानेही त्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे. Chelsea फुटबॉल क्लबचे मालक असणारे रोमन हे दोन्ही राष्ट्राध्यक्षांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी इस्तांबूल, मॉक्सो आणि कीव अशा चकरा मारत आहेत.

रोमन अब्रामोविच यांच्यावर विषप्रयोग –

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, रोमन अब्रामोविच आणि युक्रेनमधील शांतीदूतांनी या महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनची राजधानी कीव येथे झालेल्या बैठकीनंतर संशयास्पद विषबाधाची लक्षणं जाणवली. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डोळे लाल होणे आणि चेहऱ्याची, हाताची त्वचा सोलणे अशी लक्षणं जाणवत होती. सध्या मात्र दोघांची प्रकृती चांगली असून धोक्याबाहेर आहेत.