टर्की आणि सीरिया एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत आत्तापर्यंत १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून २० हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त जणांचा ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, भूकंपामुळे १० भारतीय नागरिकही टर्कीत अडकले असून एक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – PHOTOS : दोन दिवसांत पाच भूकंप, पाच हजार नागरिकांचा मृत्यू अन् शेकडो इमारती जमीनदोस्त; टर्कीतील मन हेलावून टाकणारी दृश्यं

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा म्हणाले, भूकंपामुळे १० भारतीय नागरिक टर्कीमध्ये अडकले आहेत. ते सध्या सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच एक भारतीय नागरिक दोन दिवसांपासून बेपत्ता असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. तसेच आम्ही संबंधित व्यक्तीच्या कुटुबियांच्या संपर्कात आहोत. याबरोबच टर्कीतील भारतीयांसाठी अंकारा येथे विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – राष्ट्रीय महामार्ग सहावरील उपशमन योजना १५ वर्षांपासून प्रलंबित, वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला

दरम्यान, भारताने आतापर्यंत चार सी-१७ विमाने टर्कीमध्ये पाठवली असून यापैकी दोन विमानात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तर इतर दोन विमानात वैद्यकीय पथकं पाठवण्यात आली आहेत. तसेच एक सी-१३० विमान वैद्यकीय पथकासह सीरियालाही रवाना करण्यात आले असल्याची महिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे ( एनडीआरएफ) महासंचालक अतुल करवाल यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten indian national stuck in turkey after earthquake one missing spb
First published on: 09-02-2023 at 08:05 IST