ठाण्याच्या मुंब्रा भागातून अटक करण्यात आलेल्या रिझवान नावाच्या संशयित दहशतवाद्याला मुंबई हॉलिडे कोर्टाने सोमवारपर्यंत (२० सप्टेंबर) पोलीस कोठडी सुनावली आहे. रिझवानला रविवारी (१९ सप्टेंबर) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अर्थात महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून पकडलं होतं. त्यानंतर, त्याला मुंबईच्या हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. एटीएसच्या म्हणण्यानुसार, झाकीर हुसेन शेखच्या चौकशीदरम्यान रिझवानचं नाव समोर आलं होतं. झाकीर हुसेन शेखला महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पकडलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र एटीएसने शनिवारी झाकीर हुसेन शेखला मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर हजर केलं होतं. झाकीर हुसेन शेखला देखील दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या दहशतवादी कटासंदर्भात सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे. शेख या संशयित आरोपीचे दहशतवादी मॉड्यूलशी संबंध होते. महाराष्ट्र एटीएसच्या म्हणण्यानुसार, शेखने अटक केलेला दहशतवादी जान मोहम्मद उर्फ ​​समीर कालियाला मुंबईत शस्त्रं आणि स्फोटकं आणण्यास सांगितलं होतं.

भूमिकेची चौकशी सुरु

एटीएस सध्या दिल्लीतील दहशतवादी मोड्युलमधील रिझवानच्या भूमिकेची देखील चौकशी करत आहे. आठवड्याभरापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. यावेळी दोन पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांसह सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले हे संशयित दहशतवादी देशभरात लक्ष्यित हत्या आणि स्फोट घडवण्याचा कट रचण्याच्या तयारीत होते.

दिल्ली दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवानने कथितरित्या जान मोहम्मदचा फोन गायब करण्यात भूमिका बजावली होती. जो दिल्लीतील या दहशतवादी मॉड्यूलचा आणखी एक भाग होता. त्याचप्रमाणे, रिझवानला पाकिस्तान समर्थित दहशतवादी मॉड्यूलच्या कटाची माहिती होती असाही आरोप करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terror suspect nabbed from thane sent to police custody till monday gst
First published on: 20-09-2021 at 10:22 IST