scorecardresearch

लष्करी चौकीवर दहशतवादी हल्ला; तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

दोन दहशतवाद्यांनी जम्मूतील राजोरी जिल्ह्यातील लष्करी चौकीवर गुरुवारी सकाळी आत्मघातकी हल्ला केला.

लष्करी चौकीवर दहशतवादी हल्ला; तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार
लष्करी चौकीवर दहशतवादी हल्ला

जम्मू : दोन दहशतवाद्यांनी जम्मूतील राजोरी जिल्ह्यातील लष्करी चौकीवर गुरुवारी सकाळी आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये तीन जवान शहीद झाले. तर, चार तासांच्या चकमकीनंतर दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले.

‘‘राजौरी जिल्ह्यातील पारघल येथील लष्करी चौकीवरील जवानांना गुरुवारी पहाटे खराब हवामानाचा फायदा घेत दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या येत असल्याचे दिसले. त्यावेळी जवानांनी त्यांना आव्हान दिले. या दरम्यान दोन्ही व्यक्तींनी चौकीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत हातबॉम्ब फेकले. सतर्क जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले,’’ अशी माहिती जम्मू येथे लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली.  ‘‘चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले. तर लष्कराचे सहा जवान जखमी झाले होते. त्यापैकी तीन शहीद झाले. शहीद जवानांमध्ये सुभेदार राजेंद्र प्रसाद, लक्षमनन डी. आणि मनोज कुमार यांचा समावेश आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terrorist attack military post martyred two terrorists killed ysh