Terrorist attack on Pakistan Paramilitary Forces : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका किल्ल्यामध्ये असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी बुधवारी (३० मार्च) घातक हल्ला केला. या हल्ल्यात ६ जवानांचा मृत्यू झालाय, तर २२ जवान जखमी झाले आहेत. निमलष्करी दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ३ हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यात यश आलं.

या हल्ल्यात जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर टँक जिल्ह्याकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे दहशतवादी बलुचिस्तानमधील नूशकी आणि पंजगुरच्या पद्धतीने हल्ला करत होते. नूशकी आणि पंजगुरमध्ये दहशतवादी शिबिरात लपून बसले आणि त्यांनी अनेक सैनिकांची हत्या केली होती.

austrelian
भारतातील निवडणुकीचं वार्तांकन करण्याची परवानगी ऑस्ट्रेलिअन पत्रकाराला नाकारली? सरकारने स्पष्ट केली भूमिक
The Supreme Court asked the central government why it stopped the action against fraudulent advertisements
फसव्या जाहिरातींवरील कारवाई का रोखली? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
adhirranjan choudhari
दुसऱ्या टप्प्यात ध्रुवीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी; १३ राज्यांत लोकसभेच्या ८९ जागांसाठी शुक्रवारी मतदान

हल्लेखोर दहशतवाद्यांकडे अमेरिकी शस्त्रास्त्र

पाकिस्तान निमलष्करी दलावर हल्ला करणारे दहशतवादी अमेरिकी शस्त्रास्त्रांसह हल्ला करत असल्याचंही सांगितलं जातंय. आतापर्यंत सैन्याला तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची राजकीय कोंडी कशामुळे? देशात पुन्हा अस्थैर्य येणार का?

दरम्यान, दुसरीकडे पाकिस्तानमधील लक्की मरवत भागात राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा डाव पाकिस्तान सुरक्षा दलांनी उधळला आहे. २९ आणि २९ मार्चला ३ दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरला. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत.