श्रीनगर : जम्मू : काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याची ओळख पटली असून, तो बाबर भाई नावाचा पाकिस्तानी दहशतवादी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलगाम जिल्ह्याच्या परिवान भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली असता बुधवारी ही चकमक उडाली होती. या चकमकीत १ पोलीस शहीद झाला, तसेच ३ सैनिकांसह पाच जण जखमी झाले. चकमकस्थळावरून पोलिसांनी १ एके रायफल, एक पिस्तूल व दोन हातबॉम्ब हस्तगत केले.‘पाकिस्तानातील बाबर भाई हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी चकमकीत मारला गेला. तो २०१८ सालापासून शोपियाँ व कुलगाम भागात सक्रिय होता. रोहित छिब नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला चकमकीत वीरमरण आले. लष्कराचे ३ सैनिक व २ नागरिक किरकोळ जखमी झाले,’ अशा माहिती काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटरवर दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorist killed in kulgam encounter hailed from pakistan zws
First published on: 14-01-2022 at 03:03 IST