श्रीनगरमध्ये एका पोलीस बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार या घटनेत दोन जवान शहीद झाले असून, अन्य १२ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा हल्ला श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ येथे आज(सोमवार) सायंकाळी झाला. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र पोलीस बटालियनच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी या बस वर मोठ्याप्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

तसेच, प्राप्त माहितीनुसार दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. जम्मू-काश्मीर पोलिसांची ही बस बुलेटप्रुफ नव्हती. त्यामुळे या हल्ल्यात पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले. हल्ला झाल्यानंतर पोलीस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorists fired upon a police vehicle near zewan in pantha chowk area of srinagar msr
First published on: 13-12-2021 at 19:18 IST