कुलगाममध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात चार जवान जखमी

लष्कराच्या रोड ओपनिंग पार्टीला बनवण्यात आलं होतं लक्ष्य

संग्रहीत छायाचित्र
दहशतवाद्यांनी आज(बुधवार) दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील शम्सीपोरा भागात कुरापत केल्याचं समोर आलं. भारतीय लष्कराच्या रोड ओपनिंग पार्टीवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत.

जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लष्कराच्या प्रवक्त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
तर, ग्रनेड हल्ल्याच्या घटनेनंतर जवानांनी संबंधित परिसरास वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

मागील महिन्यात सौरा येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांचा उपचारादरम्यान एसकेआयएमएस रुग्णालायता मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Terrorists lobbed grenade on armys road opening party msr