भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी टेस्लाकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, आता भारतीय बाजारपेठेत टेस्ला कार आणण्याचा निर्णयाला इलॉन मस्क यांनी स्थगिती दिली आहे. जोपर्यंत भारत टेस्लाने बनवलेल्या कार विकण्याची भारतात परवानगी देत नाही तोपर्यंत टेस्ला नव्या कार बनवणार नसल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. मस्क यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परवानगी देण्याआधी भारत सरकारने टेस्लासमोर अट ठेवली आहे. केवळ भारतात तयार केलेल्या इलेक्ट्रिक कार टेस्ला भारतात विकू शकते अशी अट भारत सरकारने टेस्ला कंपनीसमोर ठेवली आहे. तसेच आधी चीनमध्ये तयार केलेल्या कार भारतात विकून टेस्लाला भारतीय बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा होता. या गोष्टीवरुन हा प्रस्ताव बराच काळापासून रखडला आहे.

टेस्लाला भारतात कारखाना सुरू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यावर आयात करात सूट हवी होती. जेणेकरुन टेस्लाला भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या कारची मागणी तपासता येईल. मात्र टेस्लाला भारतात कार विकण्याअगोदर भारतात कारखाना सुरु करावा लागेल आणि भारतातच तयार केलेल्या कार विकता येईल अशी अट भारत सरकारने टेस्लासमोर ठेवली आहे. त्यामुळे चीनमध्ये बनवलेल्या टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात विकता येणार नाही, असे भारतानं स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tesla wont manufacture in india unless allowed to sell service cars musk dpj
First published on: 28-05-2022 at 14:27 IST